Devendra Fadnavis Lok Sabha Special Report : देवेंद्र फडणवीस खरच सत्तून बाहेर पडणार?
Eknath Shinde on Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची स्वीकारली आहे. "मी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. मी पक्ष नेतृत्वाला विनंती करतो की, मला सरकारमधून मुक्त करावे. मला विधानसभेसाठी काम करायचे आहे", अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्रजींनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देवेंद्रजींनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते. मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला दोन लाखांहून अधिक मते मिळाली. संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोटं बोला रेटून बोलं या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले. मोदी हटाव असा नारा विरोधक करत होते. मात्र मतदारांनी या विरोधकांना तडिपार केले.