दिपक सदाफळे यांच्या कार्याला सलाम... अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये सेवा,आतापर्यंत वाचवले हजारोंचे प्राण
संपूर्ण राज्याने गेल्या आठवड्यात पाऊस अन् पुराची भयावहता अनुभवली आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातही 22 जुलैच्या रात्री महापूर आला होता. या महापुराचं पाणी अनेक घरं आणि वस्त्यांमध्ये शिरलं होतं. अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत एक देवदूत अन् त्याच्या 'टीम'नं तब्बल 17 लोकांचे प्राण वाचवले होतेय. या जीवन देणाऱ्या 'देवदूता'चं नाव आहे दिपक सदाफळे. सदाफळेंचं 'गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक' जिल्ह्यासह राज्य अन् देशांतील अनेक आपत्तीत लोकांना जीवन देणारी एक चळवळ ठरली आहे. गेल्या वीस वर्षांत अनेक नैसर्गिक आपत्तीत या पथकानं सहा हजारांवर लोकांचे जीव वाचवले आहेत. पाहुयात, गाडगेबाबांच्या नावानं एका अनोख्या सेवाभावाचा वारसा जपणाऱ्या अकोल्यातील ध्येयवादी तरूणांची ही जीवन देणारी 'चळवळ'!
All Shows
































