Pele Demise Special Report : फुटबॉलच्या देवानं घेतला जगाचा निरोप, पेले यांची संपूर्ण कहाणी ABP Majha
Pele Demise : महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले (Pele) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन (Pele Demise) झालं आहे. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो (Kely Nascimento) हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ''आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, Rest in Peice असं कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर जगभरातील फुटबॉलप्रेमी कमेंट करत असून सर्व स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
All Shows































