BMC CAG Report Special Report :फडणवीसांकडून कॅगचा अहवाल सादर, निधीचा गैरवापर केल्याचे अहवालात नमूद
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दिवस फडणवीसांनी केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटांनी गाजला. देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहात कॅगचा अहवाल मांडला. मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामांचं कॅगकडून ऑडिट करण्यात आलं आहे.. यात निधीचा गैरवापर केल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे... विशेष करुन कोरोना काळात केलेल्या कामांचं ऑडिट करण्यात आलं असून यामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून आल्याचं फडणवीसांनी नमूद केलंय. कॅगचा अहवाल तर फडणवीसांनी मांडला मात्र, त्यावर पुढील चौकशी आणि कारवाई कधी करणार?, असा सवाल आता केला जात आहे. दरम्यान, कॅगचा अहवाल हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय..
All Shows

































