'कंटेनर पलटी, बिअर फरार!' पलटलेल्या कंटेनरमधून बिअरची पळवापळवी, एका तासात कंटेनर रिकामा : वैजापूर
औरंगाबाद : 'पळवा पळवी' चित्रपटाची आठवण यावी अशी घटना औरंगाबादच्या वैजापूर (Aurangabad Vaijapur Accident) तालुक्यातील करंजखेड येथे घडली. अपघातात बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाला.. आणि अवघ्या काही तासात लोकांनी कंटेनरची कंटेनर रिकामा केला. याच बिअरच्या बॉक्सच्या पळवापळवीचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत
वैजापूर तालुक्यातील करंजखेडमध्ये काल रात्री 9 ते साडेनऊच्या दरम्यान बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाला. यानंतर बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स पळवण्याची स्पर्धा सुरू झाली. बिअर बॉक्स भरलेला कंटेनर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग काय जमेल तेवढ्या बाटल्या, जमेल तेवढे बॉक्स पळवायची स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत कंटेनरचा चालक आणि क्लिनर जखमी झाला याची जाणीवही त्यांना नव्हती. काहींनी गोणी भरून बॉक्स पळवले तर काहींना टू व्हीलर वर बॉक्स वर बॉक्स घेऊन पळवापळवी केली.
All Shows































