एक्स्प्लोर
Beed Girl Case : मतीमंद मुलीला बापाकडून अमानुष वागणूक, बीडमधील धक्कादायक प्रकार
Beed Girl Case : मतीमंद मुलीला बापाकडून अमानुष वागणूक, बीडमधील धक्कादायक प्रकार
बीडच्या गेवराई शहरातील तय्यब नगर भागात एका चिमुकल्या मुलीला डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात छत्रपती संभाजी नगर येथील दामिनी पथकाने कारवाई करत मुलीची सुटका केली. सदरील मुलीच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर पैठण येथील एका कुटुंबाने मुलीचा सांभाळ केला.
मात्र काही दिवसांनी पुन्हा ही मुलगी आपल्या नातेवाईकाकडे आली. मात्र याच घरात तिला डांबून ठेवण्यात आलं. ही घटना आहे बीड मधल्या गेवरायची. जन्मताच गतीमंद असलेल्या या मुलीच्या आईचं सहा महिन्यांपूर्वी निधन झालं. आई सोडून गेल्यानंतर या लेकीला खरं तर जास्त मायेची गरज होती. मात्र बापान तिला घराबाहेरच्या गोठ्यावजा शेडमध्ये बांधून ठेवलं.
हे त्या मुलीचं घर होतं. अनेक वर्ष ती खर तर या ठिकाणी राहिलेली होती. इथे बाजूलाच जो गोठा होता या ठिकाणी या गोठ्यामध्ये देखील त्या मुलीला काही काळ डांबून ठेवण्यात आलेल होता. असंवेदनशीलतेचा कहर म्हणजे जेवण म्हणून या मुलीसमोर कधी केळीच्या तर कधी कलिंगडाच्या साली फेकल्या जायच्या. बापान तिच जग पत्र्याच्या चार शेडपुरत मर्यादित करून ठेवलं.
अखेर पैठणहून पाहुणी म्हणून आलेल्या एका महिलेला. ज्यांचं मातृत्व जागृत होतं, त्या माहेरी आल्या, त्यांनी या मुलीच्या वेदना पाहिल्या, असहाय झालं, त्यांनी तिची सुटका केली आणि छत्रपती संभाजीनगरच्या सामाजिक संस्थेत तिला दाखल केलं आणि वेदनेपासून तिची मुक्तता झाली. जेव्हा दामिनी पथक या मुलीपर्यंत पोहोचलं, तेव्हा तिची अवस्था पाहून दामिनी पथकातल्या महिलांच्या
डोळ्यातही अश्रू उभे राहिले. जेवाला खाऊ भरवण्यासाठी जेव्हा दामिनी पथक मुलीला घेऊन दुकानात गेलं तेव्हा त्यांनी काय अनुभवलं हे त्यांच्याच तोंडून ऐका तुम्ही पण आई आहात काय वाटलं पहिल्यांदा हे सगळं बघून सर जेव्हा ते बघितलं तर अक्षरशा म्हणजे अंगाचा थरकाप होईल असं पायाखालची माती सरकली म्हणतात तसं तिला आई नव्ही बिना आईची लेकरू आणि तिला
ती बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती आणि खाण्यासाठी खूप तडपडत होती तर त्यामुळे त्या मलाही खूपच म्हणजे हृदय हे लावून टाकणारी घटना मला दिसून आली. सवाल आहे माणुसकीच्या अस्तित्वावर एक पिढीच बालपण वाचवायचं असेल, माणुसकी जिवंत ठेवायची असेल, तर अशा घटनांकडे डोळसपणे पाहून त्यावर आवाज उठवायला पाहिजे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report

Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?

Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



























