अकोल्याच्या 'बकरी बँके'ची जगभरात चर्चा, 'गोट बँक ऑफ कारखेडा'मुळे गाव 'क्रांतीकारी' बदलांच्या वाटेवर!
अकोला : आतापर्यंत आपण अनेक बँका पाहिल्या आहेत. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अशा एक ना अनेक बँका आपण पाहिल्या असतील. मात्र, अकोल्यात दोन वर्षांपूर्वी एका कल्पनाशक्तीच्या बाहेरील संकल्पनेची बँक स्थापन झाली आहे. राज्यासह देशाच्या ग्रामीण भागात 'अमुलाग्र' आणि 'क्रांतीकारी' बदल घडवू पाहणारी ही बँक आहे. या बँकेत पैशांचा कोणताही व्यवहार होत नाही. मात्र, येथील व्यवहार मात्र तुम्हाला लखपती, करोडपती बनविणारा आहे. मग बिना पैशांची ही बँक कशी आहे. कसं चालतं या बँकेचं काम?... ग्रामीण भागात बदल घडविणाऱ्या या बँकेचं 'मॉडेल' नेमकं आहे कसं? , अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 'गोट बँक ऑफ कारखेडा' समजवून घेऊयात.
All Shows
































