Ahmedabad plane crash : देव तारी त्याला कोण मारी, अहमदाबाद भीषण विमान अपघातातून Ramesh Vishwas वाचला
तुमचा चमत्कारावर विश्वास आहे का?
नसेल तर रमेश विश्वासकुमार या माणसाला भेटा, अहमदाबादच्या भीषण विमान अपघातातून २४२ पैकी हा एकमेव माणूस वाचलाय.. हा अपघात एवढा भीषण होता की त्यातला एकही प्रवाशी वाचण्याची शक्यता नव्हती, एपी सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं सुद्धा सर्व प्रवासी मृत्यूमुखी अशी बातमी दिली होती. दैव बलवत्तर असलेल्या रमेशचा अनुभव ऐकुयात
देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आजच्या अहमदाबाद-लंडन अपघातावेळी आलाय दृश्यात दिसणारी ही व्यक्ती त्याच अपघातग्रस्त विमानातील प्रवासी आहे
६२५ फुटांवरुन पडूनही ही व्यक्ती आपल्या दोन्ही पायांवर चालत निघालीय रमेश विश्वकुमार अहमदाबादहून लंडनसाठी दुपारच्या फ्लाईटने रवाना झाले ११ नंबरच्या सीटवरुन ते प्रवास करत होते विमानाचं उड्डाण झाल्यानंतर काहीच क्षणात विमान कोसळलं विमान कोसळताच मोठा स्फोट झाला
ही दृश्य पाहून या अपघातात कुणीच बचावलं नसेल असाच अंदाज लावण्यात आला
पण, नियतीच्या मनात काही औरच होतं
अपघातानंतर रमेश विश्वकुमार घटनास्थळावरुन थेट आपल्या पायाने चालत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचले आणि चमत्कार काय असतो याची प्रचीती आली.
मुंबई : गुजरातमधील विमान दुर्घटनेत (Ahmedabad plane crash) 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एका प्रवाशाचं नशिब बलवत्तर म्हणून तो बचावला. सध्या जखमी प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एअर इंडियाची फ्लाईट एआय -171 ने अहमदाबाद येथून लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ते दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात विमानातील (Airplane) 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 12 क्रू मेंबर्संनाही आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 4 चार क्रू मेबर्सं होते, विशेष म्हणजे कॅप्टन सुमित पुष्कराज सभ्रवाल यांच्यासह आणखी 3 क्रू मेंबर्स हे महाराष्ट्रातील रहिवाशी होते. त्यामध्ये, सुमित पुष्काराज आणि अर्पण महाडिक हे दोघे मुंबईतील (Mumbai) रहिवाशी आहेत. तर, दीपक पाठक हे बदलापूरचे आणि रोशनी सोनघरे ह्या डोंबिवलीकर आहेत. या दुर्घटनेत 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्संचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुबीयांवर व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
All Shows

































