Saat Barachya Batmya : 7/12 : नंदुरबार बाजार समितीत उन्हाळी भुईमूग शेंगांची आवक वाढली
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळी भुईमूग शेंगांचे आवक मोठ्या प्रमाणात होत आहे भुईमुगाच्या शेंगांची आवक वाढली असली तरी शेतकऱ्यांना पाहिजेल तसा दर मिळत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च निघणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. बाजार समितीत ओल्या भुईमुगाच्या शेंगांना चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे तर कोरड्या शेंगांना सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे आवक वाढली असली तरी दर समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या मिळत असलेल्या दर लक्षात घेता शेतकऱ्यांनी खर्च केलेला उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे.
All Shows

































