Saat Barachya Batmya 712 : लम्पी आजाराचा बैल पोळ्यावर परिणाम, बैल फिरवण्यासाठी शासकीय निर्बंध Latur
आज बैलपोळा, भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये बैलाचं महत्व अधोरेखित करणारा सण. वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना आज शेतातील कामापासून आराम दिला जातो. वर्षभर बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला असतो. परंतु याच बैलपोळा सणावर यंदा लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतोय. यामुळे प्रशासनाने पोळ्याच्या दिवशी बैल एकत्रित आणणे, बैलांची गावातून मिरवणूक काढणे यावर बंदी आणली आहे. बैल फिरवण्याच्या वेळेस अनेक पशुधन एकत्र येत असतात आणि त्यातून रोगाचा प्रसार होऊ शकतो हे टाळण्यासाठी प्रशासनांनं सक्तीचं पाऊल उचललं आहे. लातूर जिल्हयातील एकूण १० तालूक्यातील १९७ ईपीसेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लंपी चर्म रोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. गोवर्गीय पशुधनामध्ये मर्तुकीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे. यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या आदेशानुसार जिल्हयातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाचे बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील सर्व पशुपालक आणि शेतकरी यांनी घरगुती स्वरुपात बैल पोळा सण साजरा असे आव्हान ही करण्यात आले आहे.