Vishwas Patil Majha Katta : छत्रपती संभाजीराजेंची शौर्य गाथा सांगणारे इतिहासकार विश्वास पाटील माझा कट्टावर
Vishwas Patil Majha Katta : छत्रपती संभाजीराजेंची शौर्य गाथा सांगणारे इतिहासकार विश्वास पाटील माझा कट्टावर
स्वराज्याचे दुसरे छत्रपती... छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विद्वत्ता आणि शौर्याचा अपूर्व संगम... शुन्यातून स्वराज्य निर्माण करणं कठीण होतंच, पण त्याहून आव्हानात्मक होतं एकाचवेळी ५ आघाड्यांवर पंजेफाड करत स्वराज्य टिकवणं...हे साधलं ते छत्रपती संभाजी महाराजांनी...शंभुराजांच्या तलवारीच्या पात्याला जेवढी धार होती तेवढीच त्यांच्या लेखणीच्या पात्यालाही होती...शंभुराजे हे व्यक्तिमत्वच असं की कितीही लिहिलं, बोललं तरी आभाळ ओंजळीत घेण्याचा प्रयत्न ठरावा...
दुर्दैवाने याच महापराक्रमी शंभुराजांच्या शौैर्यसूर्याला, संशय, बदफैली, दुराग्रही अशा विशेषणांचं ग्रहण लागलं...हे ग्रहण सोडवण्यात अनेक व्यासंगी लेखक आणि इतिहासकारांचा मोलाचा वाटा आहे, त्यापैकीच एक विश्वास पाटील... संभाजी महाराजांवरील त्यांनी लिहिलेली संभाजी ही कादंबरी बुकशेल्फमध्ये आवर्जून सापडते.
सध्या महाराष्ट्रासह देशभरात छावा सिनेमाची घोडदौड सुरु आहे...शंभूराजांच्या शौर्याने आणि त्यागाने प्रेक्षकांचे डोळे दिपून जातायत. पण त्यासोबतच उफाळून आलाय वाद...केवळ वाद नव्हे जातीयवाद...शिवशंभूंच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाण्याऐवजी, वादाचे नगाडे वाजवण्यातच अनेकजण धन्यता मानताना दिसतायत...मराठी मनाला दुहीचा शाप आहे हे वाक्य आज शेकडो वर्षांनंतरही जैसे थे च आहे...
छत्रपती संभाजी महाराजांंचं कार्यकर्तृत्व आणि त्याच दैदिप्यमान इतिहासाला चिकटलेली वादाची झालर या सगळ्याबाबत आज आपण इतिहासकार, लेखक विश्वास पाटील यांच्याशी संवाद साधुया
All Shows
































