Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 5 PM : 16 जुलै 2024: ABP Majha
मुंबईतील वरळी अपघात प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शाहला सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी. मिहीरने पोलिसांना दिलेला कबुलीजबाब वाचून सुनावली कोठडी.
माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती. अजॉय मेहतांच्या जागी पदभार स्वीकारणार.
शरद पवारांचा शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक दौरा, स्वर्गीच अशोक भांगरे यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार, पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद, सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी पुढे ढकलली, याप्रकरणी पुढची सुनावणी ६ ऑगस्टला होणार.
२ आठवड्यात अजित पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात उत्तर द्यावं आणि त्यानंतर एका आठवड्यात आम्ही उत्तर द्यावं असं कोर्टानं सांगितलं, ४ ते ५ सुनावण्यांमध्ये निकाल लागेल, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य.
राज्यातील मराठी चित्रपट निर्मात्यांनी घेतली अजित पवार यांची भेट. मराठी चित्रपटांसाठी अनुदान देणारी चित्रपट समीक्षण समिती तत्काळ बरखास्त करण्याची मागणी.
पुण्यातील येरवडा भागात अल्पवयीन मुलींची दारु पार्टी, पार्टीनंतर ११ वर्षीय तरुणीची नशेत गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट.