TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 PM : टॉप 50 न्यूज : 29 May 2024 : ABP Majha
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 PM : टॉप 50 न्यूज : 29 May 2024 : ABP Majha
मुंबईत १० किंवा ११ जूनला पावसाची सुरूवात होणार, तर १५ जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनचे आगमन होईपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार, येत्या 3 जूनपर्यंत तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज .
गोंदियाच्या नवेगावबांध परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, झाडे आणि विद्युत खांबांची पडझड, तर अनेक घरांवरील छत उडाले.
काल संध्याकाळी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस. पावसानं शेतातील कापणीला आलेलं उभं भातपीक जमीनदोस्त. आष्टी गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समितीची स्थापन. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर,बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण नसीम खान यांच्या नेतृत्वात पाहणी समिती स्थापन.
धुळे शहराला जास्तीचा पाणी कपात करण्याचा महापालिकेचा निर्णय, पाणीप्रश्न गंभीर झाल्यामुळे शहरात आठ ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा.
नाशिक शहरात भीषण पाणीटंचाई, ग्रामीण भागातही टँकरने पाणीपुरवठा, शहरातील टँकर भरणाऱ्या विहिरींनीही गाठळा तळ, टँकरच्या किंमतीत २०० ते ४०० रूपयांची वाढ.
धाराशिव जिल्ह्यातील एकवीस टक्के पाणी स्रोत्र दूषित, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत बाब उघड. दुष्काळामुळे पाणी साठा कमी, त्य़ात पाणीसाठा दूषित असल्यानं पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट.