स्मार्टफोन म्हटला की सोशल नेटवर्किंग साईट्स ओघाने आलेच. जगभरातील युवकांमध्ये कोणत्या सोशल नेटवर्किंग अॅप्सची क्रेझ आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यूएसमधील कॉमस्कोर या मोबाइल अॅपने 2017 सालाबाबत दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
2/8
7. स्नॅपचॅट - स्नॅपचॅट या अॅपचे जवळपास 50 टक्के यूझर्स आहेत. यावर फोटो क्लिक करुन वेगवेगळे फिल्टर वापरुन तुम्ही मित्रांना पाठवू शकता.
3/8
6. इन्स्टाग्राम - सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेक जण या अॅपच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. 50 टक्के यूझर्स हे अॅप वापरतात.
4/8
5. गुगल मॅप्स - गुगल मॅप्सचेही 57 टक्के यूझर्स आहेत. गुगल मॅप्स ही नेव्हिगेशन सिस्टीम असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग दाखवते. सोबतच ट्रॅफिक अपडेट्स, लोकेशन टायमिंग, शॉर्टकट रुट असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.
5/8
4. गुगल सर्च - जवळपास 61 टक्के अॅप यूझर्स गुगलचं हे सर्च इंजिन वापरतात. ताज्या बातम्यांपासून कोणत्याही विषयाची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी गुगल अक्षरशः धावून येतं.
6/8
3. फेसबुक मेसेंजर - फेसबुकचंच असलेलं मेसेंजर हे अॅप 68 टक्के स्मार्टफोन यूझर्स वापरतात. फेसबुक मेसेंजरवरुन तुम्ही फेसबुकवरील फ्रेण्ड्ससोबत चॅटिगं करु शकता. व्हिडिओ चॅटिंगचा पर्यायही इथे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे फोटो, व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट शेअरही करु शकता.
7/8
2. यूट्यूब - 71 टक्के यूझर्स यूट्यूब हे अॅप वापरत असल्याची माहिती आहे. यूट्यूब हा व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर तुम्ही इतरांचे व्हिडिओज पाहूही शकता आणि स्वतःचे व्हिडिओ अपलोड करुन जगाला दाखवूही शकता. यूट्यूबच्या माध्यमातून पैसा कमवता येत असल्यामुळे अनेक जण याकडे प्रोफेशन म्हणून पाहतात.
8/8
1. फेसबुक - तब्बल 81 टक्के स्मार्टफोन यूझर्स फेसबुक अॅप वापरतात, असं कॉमस्कोरने म्हटलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण आपल्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहतात. फेसबुकने लाईव्ह आणि स्टोरी हे दोन नवीन फीचर्सही दिले आहेत.