iPhone 14 आणि iPhone 14 plus चा आला यलो मॉडेल, जाणून घ्या काय आहे खास
Yellow iPhone 14 : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Apple चा iPhone 14 आणि iPhone 14 plus पाच ऐवजी आता 6 रंगात ग्राहक खरेदी करू शकता. या दोन्ही मॉडेल्ससाठी कंपनीने नुकताच पिवळा रंग सादर केला होता.
Yellow iPhone 14 : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Apple चा iPhone 14 आणि iPhone 14 plus पाच ऐवजी आता 6 रंगात ग्राहक खरेदी करू शकता. या दोन्ही मॉडेल्ससाठी कंपनीने नुकताच पिवळा रंग सादर केला होता. तुम्ही पिवळ्या रंगाच्या आयफोनची ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनवरून प्रीऑर्डर करू शकता. कंपनी 14 मार्चपासून नवीन मॉडेलची डिलिव्हरी सुरू करणार आहे. याशिवाय तुम्हाला मोबाईल फोनवर एक्सचेंज ऑफर म्हणून 18,050 रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन नवीन मॉडेल विकत घेतल्यास, तुम्ही हा फोन स्वस्तात मिळवू शकता. या फोनमध्ये कंपनीने नवीन रंग व्यतिरिक्त आणखी काय नवीन दिल आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
या तीन वेबसाइटवरून तुम्ही यलो आयफोन खरेदी करू शकता
- अॅमेझॉन
- फ्लिपकार्ट
- Apple.in
आयफोन 14 चे फीचर्स
iPhone 14 मध्ये तुम्हाला 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. तुम्ही मोबाईल फोन 128 आणि 256GB या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. स्मार्टफोनमध्ये A15 बायोनिक चिपसेट सपोर्ट आहे. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला मागील बाजूस 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे मिळतात आणि समोर सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. आयफोन 14 एका चार्जवर 20 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो.
त्याचप्रमाणे iPhone 14 Plus बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला iPhone 14 पेक्षा थोडा मोठा डिस्प्ले मिळेल आणि तो 6.7 इंच आहे. iPhone 14 plus मध्ये बॅटरी बॅकअप देखील चांगला आहे. हा फोन सुमारे 26 तासांसाठी व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो.
Samsung 16 मार्च रोजी 2 फोन लॉन्च करणार
कोरियन कंपनी सॅमसंग 16 मार्च रोजी 2 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्यात Galaxy A54 आणि Galaxy A34 यांचा समावेश आहे. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 30,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. Samsung Galaxy A54 ची स्पर्धा OnePlus 11R सोबत असेल. यामध्ये तुम्हाला 6.4 इंच FHD + AMOLED डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. दरम्यान, Samsung ने अलीकडेच आपला Galaxy M सीरीजचा पहिला फोन लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M14 असे या फोनचे नाव आहे. मात्र हा फोन अजून भारतात लॉन्च झालेला नसून युक्रेनमध्ये लॉन्च झाला आहे. लवकरच हा फोन ग्लोबल मार्केटमध्येही लॉन्च केला जाईल, अशी अपेक्षा आहे. फोनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले, तर हा Galaxy A14 5G सारखा आहे. A सीरीजचा Galaxy A14 5G स्मार्टफोन कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला होता.