एक्स्प्लोर
Paytm वापरण्याआधी तुम्हाला हे माहित आहे का?

1/8

सध्या ज्या ग्राहकांचे केवायसी व्हेरिफिकेशन झाले नसेल, त्यांना व्यवहारावर 1 टक्का सर्व्हिस चार्ज द्यावा लागतो.
2/8

तुम्हाला पेटीएमच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर पेटीएमचे मोबाईल वॉलेट असणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर्सच्या माध्यमातून हे अॅप डाऊनलोड करुन घेतल्यानंतर काही साध्या स्टेप्स फॉलो करुन सहज व्यवहार करु शकाल.
3/8

विशेष म्हणजे, पेटीएमचा वापर तुम्ही फक्त दैनंदिन व्यवहारासाठीच नव्हे, तर पेटीएम वॉलेटच्या मदतीने तुम्ही पैसे बँकेतही ट्रांसफर करु शकता.
4/8

पेटीएमचे नवे ग्राहक आता केवळ तीनच दिवसात बँक अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करु शकतात. यासाठी पूर्वी 45 दिवसांची कालावधी लागत असे.
5/8

यासाठी तुम्हाला पेटीएमवरुन 'पे ऑर सेंड' ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर 'सेंड टू बँक' ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे पैसे ट्रान्सफर होतील. पण यावेळी तुमच्याकडे बँक अकाऊंट नंबर आणि IFSC कोड नंबर असणेही गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेचा IFSC कोड इंटरनेटच्या मदतीनेही सहज मिळवू शकता.
6/8

पेटीएम वॉलेटमधून बँकेत पैसे ट्रांसफर करण्याचा सर्वाधिक फायदा लहान व्यापरी किंवा रिक्षा चालकांना होऊ शकतो. कारण रोज पेटीएम वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट घेतल्याने तुमच्या पेटीएम वॉलेटवर पुष्कळ पैसे जमा होतात. त्यामुळे हे पैसे तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटवर ट्रान्सफर केल्याने मोठी काळजी मिटू शकते.
7/8

तुम्ही जेव्हा पेटीएमवर लॉग इन करता, तेव्हा तुम्हाला तुमचा फोन नंबर तुमच्या ईमेलच्या मदतीने अकाऊंटशी लिंक करावे लागतो. पेटीएमला तुमच्या अकाऊंटशी जोडल्यानंतर तुम्ही पेटीएमचा वापर करु शकता.
8/8

मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात पेटीएम मोबाईल वॉलेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. रिक्षा चालकापासून ते लहानातील लहान व्यापाऱ्याकडे सध्या पेटीएम सेवा उपलब्ध आहे. कॅशलेस व्यवहारासाठी नागरिकही पेटीएमचा वापर सहजपणे करत आहेत. पण अजूनही काहीजणांना याच्या वापराविषयी पुरेशी माहिती नसल्याने अनेकांना अडचणी येत आहेत. त्यासाठीच पेटीएमच्या वापरासंबंधी माहिती तुम्हाला देत आहोत.
Published at : 08 Jan 2017 10:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
