404 Page Not Found केव्हा दिसतं? या एररचा अर्थ नेमका काय? वाचा सविस्तर
404 Error : तुम्ही लॅपटॉप किंवा स्मार्टफोन वापरत असल्यास, तुम्हाला Google Chrome किंवा इतर ब्राउझरमध्ये कधीतरी 404 एरर दिसला असेल.
404 Error : तुम्ही लॅपटॉप किंवा स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही कधी ना कधी गुगल क्रोम (Google Chrome) वापरलाच असेल. जेव्हाही आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असते तेव्हा सर्वात आधी आपण गुगल क्रोमवर जातो आणि तिथे हवी ती माहिती शोधतो. तसेच, कधीकधी आपल्याला अनेक प्रकारचे एरर देखील दिसतात. यापैकी सर्वात सामान्य म्हणजे '404 एरर'. क्रोमवर दिसणाऱ्या या एररबद्दल तुम्हाला माहित आहे का? नसेल, तर क्रोमवर हे असं का दिसतं? आणि या 404 एररचा अर्थ नेमका काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
404 एरर का दाखवली आहे?
404 एरर ही गुगल सर्चवर आढळणारी सर्वात सामान्य एरर आहे. तसेच, बहुतेक लोकांना ते कोणत्या स्थितीत दिसते हे माहित नाही. त्याचा एक अर्थ आहे. हा एरर कधीकधी 404 page not found म्हणून देखील दिसते.
जर तुम्हाला या संदर्भात माहित नसेल, तर 404 हा HTTP स्टेटस कोड आहे. हे वेब सर्व्हरद्वारे पाठवले जाते. खरंतर, जेव्हा एखादी व्यक्ती इंटरनेटच्या जगात कोणताही कंटेंट शोधते तेव्हा त्याची रिक्वेस्ट Google च्या सर्व्हरवर पाठविली जाते आणि यूजर्सना त्या कंटेंटशी संबंधित किंवा त्याच्याशी संबंधित उत्तरे दिली जातात. पण जेव्हा Google उत्तर शोधू शकत नाही, तेव्हा डिस्प्लेवर 404 एरर दिसते.
404 एरर किंवा पेज नॉट फाऊंड एररची अनेक कारणे असू शकतात. तुम्ही शोधलेला कंटेंट असलेले पेज कदाचित काढले गेले असेल. तुम्ही टाकलेल्या URL मध्ये काही प्रकारची चूक असण्याचीही शक्यता आहे. किंवा तुम्ही काही कंटेट शोधत असाल ज्याला तुमच्या सर्व्हरने परवानगी दिली नाही तर तुम्हाला या प्रकारची त्रुटी दिसू शकते. 404 एरर हे एक नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल एरर आहे.
एररमध्ये 404 क्रमांक का वापरला गेला
आता या प्रकारच्या एररसाठी फक्त 404 क्रमांक का वापरला गेला हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तसेच, दुसरा नंबर का निवडला नाही? असंही वाटत असेल तर या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पण, एका सिद्धांतात याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे. CERN (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च) सिद्धांत हे वेब सर्व्हरचे घर असल्याचे म्हटले जाते. या घरात 404 क्रमांकाची खोली होती. त्यांच्या नावावरून हे एरर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनेक तज्ञांनी हा सिद्धांत नाकारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :