HTech News : Honor ने भारतात लाँच केले स्मार्टवॉच आणि इयरबड्स; जाणून घ्या वैशिष्ट्यांसह आकर्षक लॉन्च ऑफर
HTech News : Honor ने भारतात आपल्या स्मार्टफोनसह स्मार्टवॉच आणि इयरबड लॉन्च केले आहेत.
HTech News : HTech या ब्रॅंडने नवीन स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इअरबड्स भारतात लॉन्च केले आहेत. HONOR X9b हा स्मार्टफोन नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. तसेच, या स्मार्टफोनबरोबर कंपनीने HONOR CHOICE Watch स्मार्टवॉच आणि HONOR X5 Earbuds देखील लॉन्च केले आहेत. या गॅजेट्सचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे ते पाहूयात.
HONOR CHOICE Watch
Honor चॉइस वॉच हे Haylou Watch ची रिब्रँडेड व्हर्जन आहे जी अलीकडेच चीनमध्ये लॉन्च झाली आहे. या स्मार्टवॉचमध्ये अल्ट्रा-स्लिम AMOLED डिस्प्ले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते फक्त एका क्लिकवर SOS कॉलिंग करू शकतात. यामध्ये 120 स्पोर्ट्स मोड देखील देण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला या स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगत आहोत.
यात 1.95 इंच AMOLED डिस्प्ले, 550 nits ब्राइटनेस, मेटल फ्रेम डिझाईन, सिलिकॉन स्ट्रॅप्स, 5ATM वॉटर रेझिस्टन्स, हार्ट रेट, SpO2, ब्लूटूथ 5.3, ब्लूटूथ कॉलिंग, 300mAh बॅटरी, मॅग्नेटिक चार्जिंग, 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप, अनेक विशेष वैशिष्ट्ये आहेत. जसे वर्कआउट मोड प्रदान केले आहेत. याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये मासिक पाळी चक्र ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग, दिवसभर हेल्थ मॉनिटरिंग, सेडेंटरी अलार्म, डीप ब्रीदिंग एक्सरसाइज, हायड्रेशन अलर्ट यांसारखी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत.
या Honor स्मार्टवॉचची किंमत 6,499 रुपये आहे. पण, लॉन्च ऑफर अंतर्गत ते 5,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. हे स्मार्टवॉच ॲमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे घड्याळ खरेदी करण्यासाठी यूजर्सना ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलर पर्याय मिळतील. या घड्याळाची विक्री 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
HONOR CHOICE X5 इअरबड्स
या इअरबड्समध्ये कंपनीने 13.4mm ड्रायव्हर, मूव्हिंग कॉइल लाउडस्पीकर, 30db नॉइज कॅन्सलेशन सपोर्ट, प्रत्येक बड्समध्ये 30mAh बॅटरी, चार्जिंग केसमध्ये 410mAh बॅटरी, एका चार्जिंगवर 5 तास प्लेबॅक, चार्जिंगवर 35 तास प्लेबॅकची हमी दिली आहे. केस, ब्लूटूथ 5.3, पॉप-अप पेअर, ड्युअल कनेक्टिव्हिटी, फाइंड युवर इयरबड्स, EQ साउंड इफेक्ट, टच सेन्सर यांसारखी अनेक खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. Honor च्या या इयरबड्सची किंमत 1,999 रुपये आहे. हे फक्त व्हाईट कलरच्या ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे. ज्या लोकांना हे इअरबड्स विकत घ्यायचे असतील ते आजपासून या इअरबड्सची खरेदी करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :