(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भन्नाट फिचर्ससह Realme 12+ 5G स्मार्टफोन भारतात 6 मार्चला होणार लॉन्च; किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
Realme 12+ 5G Smartphone : Realme 12 5G आणि Realme 12+ 5G फोन Realme 12 सीरीज अंतर्गत भारतात लॉन्च केले जातील.
Realme 12+ 5G Smartphone : तुम्ही जर रिअलमी स्मार्टफोनचे (Realme Smartphone) चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Realme लवकरच भारतात आपला मिड-बजेट स्मार्टफोन Realme 12 सीरीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या सीरिजच्या अंतर्गत दोन स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. यापैकी एक Realme 12 5G असेल, तर दुसरा स्मार्टफोन Realme 12+ 5G असेल. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात 6 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च केले जातील. आता या स्मार्टफोनमध्ये कोणकोणते फीचर्स असतील तसेच, या स्मार्टफोनची किंमत किती असणार या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
काय असेल विशेष?
दोन्ही स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल कॅमेरा सेटअप असेल असा कंपनीचा दावा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्मार्टफोनमध्ये Sony LYT600 सेंसर असेल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजेच OIS सपोर्टसह येईल. हा मिड-बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोन आहे असा कंपनीचा दावा आहे. 50MP Sony LYT 600 प्रायमरी कॅमेरा सेन्सर असेल. यात 2X इन-सेन्सर झूम असेल. Realme 12+ 5G स्मार्टफोनमध्ये सर्व नवीन पोर्ट्रेट सिस्टम दिली जाईल. कस्टम डायनॅमिक पोर्ट्रेट कॅप्चर असलेला हा पहिला स्मार्टफोन आहे.
स्मार्टफोनची किंमत किती असेल?
Realme 12+ 5G स्मार्टफोनची किंमत 19,999 रूपये इतकी असेल असा दावा करण्यात आला आहे. पण, ही बेस व्हेरिएंटची किंमत असेल असंही सांगण्यात येतंय. तर, Realme 12 5G स्मार्टफोनची किंमत किती असेल हे अद्याप जाहीर झालेलं नाही.
विशेष वैशिष्ट्ये उपलब्ध असतील
Realme 12+ 5G मध्ये Cinematic Bokeh अल्गोरिदम समर्थन प्रदान केले जाईल, जे DSLR प्रभावासह येईल. हा फोन प्रीमियम व्हेगन लेदर बॅक डिझाईनमध्ये येईल. हे सेगमेंट फर्स्ट रेनवॉटर स्मार्ट टच टेक्नॉलॉजीवर आधारित असेल. Realme 12+ 5G स्मार्टफोनमध्ये
तपशील
Realme 12 सीरिजमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 7050 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोन 5000mAh बॅटरी पॅकसह ऑफर केला जाऊ शकतो. तसेच 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग ऑफर केले जाईल. हा स्मार्टफोन Android 14 आधारित Realme UI 5.0 वर कार्य करेल.50 मेगापिक्सेल मेन सेन्सर व्यतिरिक्त यामध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड अॅंगल लेंस आणि 2 मेगापिक्सेलचा मायक्रो लेंससुद्धा असेल. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा लेंस देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :