एक्स्प्लोर

PM Narendra Modi: मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती

PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोट्यवधी मोबाईलधारकांच्या स्क्रीनवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज आणि वाजणारे सायरन आता बंद होणार आहेत.

PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोट्यवधी मोबाईलधारकांच्या स्क्रीनवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज (Emergency Messages) आणि वाजणारे सायरन आता बंद होणार आहेत. केंद्र सरकारने पुढील आदेश येईपर्यंत ही 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम' (Cell Broadcast Alert System) तात्पुरती स्थगित केली आहे. देशभरात या प्रणालीची यशस्वी चाचणी (Successful Testing) पूर्ण झाल्यानंतर, 12 जून 2026 पासून ही सेवा पुढील आदेशापर्यंत रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांनी (Disaster Management Departments) मध्यरात्रीच्या सुमारास आपत्तीचा एक चाचणी अलर्ट जारी केला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे हा आपत्कालीन मेसेज थेट एका बड्या नेत्याच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर जाऊन पोहोचला. या यंत्रणेचे वैशिष्ट्य असे की, फोन सायलेंट मोडवर (Silent Mode) किंवा पूर्णपणे बंद (Switch Off) असतानाही यात मोठ्या आवाजात सायरन वाजतो. झेड सुरक्षा असलेल्या नेत्यांच्या फोनवर मध्यरात्री अचानक हा सायरन वाजल्याच्या अजब प्रकारानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) तातडीने आदेश जारी करत या सेवेला पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगिती दिली आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या मोबाईलवर हा मेसेज धडकल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

Cell Broadcast Technology: सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञान नेमकं काय आहे?

ही केंद्र सरकारची एक अत्याधुनिक आणि हायटेक मोबाईल आधारित अलर्ट यंत्रणा आहे. ही प्रणाली आपल्या नेहमीच्या सर्वसामान्य एसएमएस (SMS) पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. याद्वारे कोणत्याही विशिष्ट मोबाईल नंबरची गरज न भासता, एकाच वेळी एकाच परिसरातील कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांना तात्काळ सतर्क केले जाऊ शकते.

एका विशिष्ट मोबाईल टॉवरच्या (Mobile Tower) क्षेत्रात येणाऱ्या सर्वच सक्रिय उपकरणांवर हा मेसेज पाठवला जातो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपत्तीच्या काळात टेलिकॉम नेटवर्क जॅम झालेले असतानाही हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या काम करते. त्यामुळे पूर, भूकंप किंवा चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी हे अत्यंत प्रभावी मानले जाते.

Cell Broadcast Technology: एसएमएसपेक्षा ही सिस्टिम जास्त प्रभावी का?

सामान्य एसएमएसच्या माध्यमातून आपत्तीची माहिती देताना मर्यादा येतात. जेव्हा एकाच वेळी लाखो लोकांना एसएमएस पाठवले जातात, तेव्हा नेटवर्कवर प्रचंड ताण निर्माण होतो आणि मेसेज पोहोचण्यास विलंब होतो. यामुळे लोकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवणे कठीण होते.

याउलट, 'सेल ब्रॉडकास्ट सिस्टिम' थेट रेडिओ सेलचा वापर करते, ज्यामुळे सेकंदाच्या भागामध्ये मेसेज सर्व मोबाईलवर फ्लॅश होतो. या प्रणालीचे कोडिंग आर्किटेक्चर अत्यंत प्रगत पद्धतीने डिझाइन केलेले असते. त्यामुळे हा मेसेज मोबाईलच्या मुख्य ऑपरेटिंग सिस्टिमलाही ओव्हरराइड म्हणजेच बायपास करून थेट स्क्रीनवर सायरनसह उमटतो. आता ही सेवा तात्पुरती बंद झाली असली, तरी तांत्रिक त्रुटी सुधारून ती पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

TMC Crisis: ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रकरणातील सुप्रीम कोर्टाच्या निकालातील मुद्दा अभिषेक बॅनर्जींनी मांडला, टीएमसीच्या बंडखोर खासदारांची अडचण वाढणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Embed widget