Nokia ने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Nokia C12 Launch: जर तुम्ही 5,000 रुपयांच्या बजेटमध्ये तुमच्यासाठी चांगला स्मार्टफोन शोधत असाल, तर आज Nokia ने Android 12 Go Edition सह Nokia C12 स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे.
Nokia C12 Launch: जर तुम्ही 5,000 रुपयांच्या बजेटमध्ये तुमच्यासाठी चांगला स्मार्टफोन शोधत असाल, तर आज Nokia ने Android 12 Go Edition सह Nokia C12 स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. 17 मार्चपासून स्मार्टफोनची विक्री सुरू होईल आणि तुम्ही Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकाल. तुम्ही हा स्मार्टफोन Dark Cyan, चारकोल आणि लाइट मिनी रंगांमध्ये खरेदी करू शकाल. मोबाईल फोन 6.3-इंचाच्या एचडी प्लस डिस्प्लेसह येतो जो 60hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने कोणते फीचर्स दिले आहेत, याची किंमत किती आहे? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
स्पेसिफिकेशन
जर तुम्ही मोबाईल फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकली तर तुम्हाला यात ऑक्टाकोर (Unisoc 9863A1) प्रोसेसर मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला 2GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 4GB पर्यंत रॅम वाढवू शकता. स्मार्टफोनच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सेल कॅमेरा आणि सेल्फीसाठी समोर 5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा पोर्ट्रेट आणि नाईट मोडला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये 3000 mAh बॅटरी आहे, जी 5W चार्जिंगला सपोर्ट करते. एका चार्जवर हा स्मार्टफोन पूर्ण दिवस टिकू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन धूळ आणि पाण्याने खराब होणार नाही कारण याला ip52 रेटिंग देखील मिळाली आहे. कंपनी Nokia C12 ला 2 वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेट्स देईल. असं असलं तरी कंपनी यात Android OS चा सपोर्ट किती काळ देईल, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एकूणच बजेट सेगमेंटला लक्ष्य करून, नोकियाने आज हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याची विक्री 17 मार्चपासून सुरू होईल.
Introducing the all new Nokia C12, with Octa core processor, 4GB RAM, Night and Portrait mode on front and rear cameras, and the trust of Nokia phones. Get your hands on Nokia C12 to be #FullOnConfident pic.twitter.com/sSmmIKDf1f
— Nokia Mobile India (@NokiamobileIN) March 13, 2023
हा पर्याय 8000 मध्ये देखील उपलब्ध
जर तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्वत:साठी चांगला फोन घ्यायचा असेल तर POCO C55 हा एक उत्तम पर्याय आहे. हा फोन तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून 8,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला मोबाईल फोनवर 8,350 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट, डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 500 रुपयांची सूट दिली जात आहे.