Facebook Feature: Facebook मध्ये आलं नवीन लिंक हिस्ट्री फीचर, कसं वापराल आणि काय आहेत फायदे?
Facebook : Meta ने आपल्या Facebook वापरकर्त्यांसाठी नवीन लिंक हिस्ट्री फीचर आणले आहे. या नवीन फीचरचे फायदे आणि ते कसे वापरायचे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : मेटा आपल्या Facebook युजर्ससाठी दिवसेंदिवस नवनवीन फिचर्स सादर करत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी लिंक हिस्ट्री नावाने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर खासकरून मोबाईल अॅपसाठी आणण्यात आले आहे.
फेसबुक मध्ये आलं नवीन फीचर
मेटा ने हे फीचर फेसबुक प्लॅटफॉर्मसाठी अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल अॅप्ससाठी सादर केले आहे. हे फीचर तुम्ही गेल्या 30 दिवसांत तुमच्या फेसबुक अकाउंटद्वारे भेट दिलेल्या वेबसाइट्सचा मागोवा ठेवेल. फेसबुक सपोर्ट पेजनुसार, हे नवीन फीचर अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल अॅप्ससाठी जागतिक स्तरावर सादर केले गेले आहे आणि ते रोल आउट देखील सुरू झाले आहे. याचा अर्थ युजर्सनीही हे फीचर वापरण्यास सुरुवात केली आहे.
या फिचरचं काम काय असेल?
जर तुम्ही फेसबुकचे हे नवीन फीचर चालू केले तर त्यानंतर तुम्ही कोणतीही वेबसाइट उघडाल, सर्च करा किंवा तुमच्या फेसबुक अकाउंटवर पाहाल, त्याचा संपूर्ण हिस्ट्री फेसबुकमध्ये सेव्ह होईल.फेसबुकचे हे नवीन लिंक हिस्ट्री फीचर गेल्या 30 दिवसांत सर्च केलेल्या सर्व वेबसाईटविषयी माहिती देईल. तुम्ही हे फिचर कधीही चालू किंवा बंद करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
लिंक हिस्ट्री कशी चालू कराल?
स्टेप 1: फेसबुकमध्ये कोणतीही लिंक सुरु करा
स्टेप 2: आता खाली दिसणार्या थ्री डॉट मेनूवर क्लिक करा.
स्टेप 3: आता तुम्हाला Settings and Privacy या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 4: आता खाली स्क्रोल करा आणि खाली जा.
स्टेप 5: आता तुम्हाला Link History चा पर्याय दिसेल.
स्टेप 6: आता तुम्हाला Allow Link History वर क्लिक करावे लागेल.
स्टेप 7: शेवटी तुम्हाला Allow पर्यायावर क्लिक करावे लागेल.
लिंक हिस्ट्री कशी पहावी?
तुम्ही गेल्या 30 दिवसांत कोणती वेबसाइट उघडली किंवा भेट दिली हे पाहायचे असल्यास, तुम्ही काही सोप्या पायऱ्या फॉलो करून तसे करू शकता. प्रोफाइल वर क्लिक करा > सेटिंग्ज आणि प्रायव्हसीवर क्लिक करा > लिंक हिस्ट्री वर क्लिक करा. फक्त या तीन स्टेप्स फॉलो केल्याने तुम्हाला Facebook वर पाहिलेल्या प्रत्येक लिंकची तुम्हाला हिस्ट्री मिळेल.