Most Common Passwords in India : तुम्ही मोबाईल अन् सोशल मीडियासाठी जो पासवर्ड वापरताय, तोच आणखी किती भारतीय वापरतायत?
Most Common Passwords in India : सायबर सुरक्षेबाबत (Cyber Security) असंख्य इशारे आणि सावधानतेबाबत आवाहन केल्यावरही भारतीयांमध्ये अद्याप त्या संदर्भातील गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे.

Most Common Passwords in India : सायबर सुरक्षेबाबत (Cyber Security) असंख्य इशारे आणि सावधानतेबाबत आवाहन केल्यावरही भारतीयांमध्ये अद्याप त्या संदर्भातील गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. असं बोलण्यामागील कारण म्हणजे 2025 मध्ये लाखो लोक अजूनही अतिशय कमकुवत पासवर्ड (Most Common Passwords Used in 2025) वापरत असल्याचे एका अहवालातून समोर आलं आहे. कॉम्पॅरिटेकच्या (Comparitech) एका नवीन अहवालानुसार, जगातील सर्वात सामान्य पासवर्ड पुन्हा एकदा "1234556" आहे. या वर्षी वास्तविक डेटा उल्लंघनातून लीक झालेल्या 2 अब्जाहून अधिक पासवर्डचे पोर्टलने हे विश्लेषण केले आहे.
अहवालातून पुढे आलेल्या माहितीनुसार, लाखो खात्यांद्वारे "123456," "12345678," आणि ""123456789,"" हे टॉप तीन पासवर्ड वापरले गेलेत. तर टॉप टेनमध्ये "अॅडमिन," "पासवर्ड," आणि "12345" सारखे परिचित पासवर्ड होते. त्यामुळे सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने हि गंभीर आणि धोक्याची बाब ठरू शकते. संभाव्य धोका लक्ष्यात घेता वापरकर्त्यांनी या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वाधिक वापरले जाणारे टॉप 10 पासवर्ड कोणते? (Top 10 Most-used Passwords)
- 12345678
- 123456789
- admin
- 1234
- Aa123456
- 12345
- password
- 123
- 1234567890
खरं तर, टॉप 1,000 पासवर्डपैकी जवळजवळ चारपैकी एका पासवर्डमध्ये फक्त संख्या होत्या. एक तृतीयांश पेक्षा जास्त (38.6%) मध्ये "123" हा क्रम होता. तर काही वापरकर्ते थोडे अलर्ट झाल्याचे दिसून आलेत. टॉप 1,000 पासवर्डपैकी जवळजवळ 4% मध्ये "पासवर्ड" चे बदल दिसले, तर "अॅडमिन" 2.7% मध्ये दिसले. कॉम्पॅरिटेकच्या मते, "क्वर्टी" आणि "वेलकम" देखील अहवालात दिसलेत. सोबतच माइनक्राफ्ट हा 100वा सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड बनलाय, जो जवळजवळ 90,000 वेळा दिसून आला. दरम्यान, "इंडिया@123" (India@123) ने टॉप 100 मध्ये 53व्या क्रमांकावर स्थान मिळवले, जे काही प्रादेशिकदृष्ट्या विशिष्ट नोंदींपैकी एक आहे.
बहुतेक तज्ञ किमान 12 डिजिट पासवर्डची लांबी ठेवण्याची शिफारस करतात. पासवर्डची लांबी वाढवल्याने तो क्रॅक होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते. परंतु अहवालानुसार, 65.8 % पासवर्डमध्ये 12 पेक्षा कमी अक्षरे होती.
सायबर घोटाळा, गोपनीयतेला धोका
दरम्यान, 'admin123' हा फक्त एकच डिफॉल्ट पासवर्ड आहे ज्यामुळे देशभरातील महिलांच्या गोपनीयतेला धोका निर्माण करणारा सर्वात मोठा सायबर घोटाळा उघड झाला. राजकोटच्या पायल मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेला हा खटला आता भारतातील सर्वात भयानक डिजिटल गुन्ह्यांपैकी एक मानला जात आहे.
ज्यामध्ये हॅकर्सनी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही सिस्टममध्ये हॅक केले आणि स्त्रीरोग वॉर्डमध्ये तपासल्या जाणाऱ्या महिलांचे व्हिडिओ चोरले. हे व्हिडिओनंतर आंतरराष्ट्रीय पॉर्न नेटवर्क्सवर विकले गेले. सुरुवातीला, हा एक किरकोळ सुरक्षा उल्लंघन मानला जात होता, परंतु तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे हे उघड झाले की हा देशभरात कार्यरत असलेला एक संघटित सायबर रॅकेट होता.
ही बातमी वाचा:
























