Mobile Safety Tips : तुमचा फोन तुमच्या नकळत टॅप होतोय? चिंता सोडा, फक्त 'हे' 5 मार्ग फॉलो करा
Mobile Safety Tips : जर, तुमचाही फोन टॅप (Phone Tap) होत असेल तर तुम्हाला वेळीच याची माहिती असणं गरजेचं आहे. यासाठीच या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा काही सिक्रेट कोडबद्दल सांगणार आहोत.
Mobile Safety Tips : अनेकदा आपला मोबाईल (Mobile) व्यस्त येत असतो किंवा काही वेळेला फोन (Smartphone) बंद तर संपर्क क्षेत्राच्या बाहेर ऐकू येतो. आपल्या मित्र-मंडळी, नातेवाईकांकडून आपण अनेकदा ही तक्रार ऐकली असलेच. अशा वेळी नेटवर्क खराब असल्या कारणाने अशी समस्या येत असेल असं आपल्याला वाटतं. पण, हा तुमचा गैरसमज असू शकतो. यामागे आणखीही काही कारण असू शकतं. अनेकदा हा फोन टॅपिंगचा प्रकार देखील असू शकतो. जर, तुमचाही फोन टॅप (Phone Tap) होत असेल तर तुम्हाला वेळीच याची माहिती असणं गरजेचं आहे. यासाठीच या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा काही सिक्रेट कोडबद्दल सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा मोबाईल टॅप होण्यापासून वाचवू शकता. तसेच, तुमचा फोन टप होतोय की नाही हे सहजपणे ओळखू शकता. यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात.
'हे' Secret Code तुमचा मोबाईल टॅप होण्यापासून वाचवू शकतील
1. Code *#*#4636#*#*
तुम्हाला जर तुमचा फोन टॅप होतोय असा संशय येत असेल तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरून हा कोड डाईल करा. या कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनच्या संदर्भातील सर्व माहिती मिळवू शकता. यामध्ये फोनची बॅटरी किती आहे, वायफाय कनेक्शन टेस्ट, फोनची माहिती, रॅम किती आहे? या संदर्भातील सर्व माहिती जाणून घेऊ शकता. तुम्ही फ्रीमध्ये या सेवेचा लाभ घेऊ शकता.
2. Code ##002#
हा कोड ज्यांचे स्मार्टफोन आहेत अशा लोकांसाठी महत्त्वाचा कोड आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमचा कॉल तुमच्या नकळत फॉरवर्ड केला आहे तर, या कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फोन नंबरचे सर्व फॉरवर्डिंग डि-ॲक्टिव्हेट करू शकता.
3. Code *#21#
या कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे मेसेज, कॉल किंवा इतर कोणताही डेटा तुमच्या नकळत वळवला गेला आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. जर कोणी तुमचा डेटा टॅप करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा केला असेल तर तो या कोडच्या मदतीने मिळवू शकतो.
4. Code *#62#
अनेक वेळा तुमचा नंबर मोबाईल नेटवर्क झोनच्या बाहेर असल्याचा मेसेज देतो. अशा वेळी तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क कंपनीच्या नावाऐवजी नो-सर्व्हिस असे दिसते. तुम्ही तुमच्या फोनवरून हा USSD कोड डायल केल्यास, तुम्हाला कळेल की तुमचा फोन दुसऱ्या क्रमांकावर रीडायरेक्ट झाला आहे की नाही. मोबाईल नेटवर्क कंपनीच्या चुकीमुळे अनेक वेळा तुमचा नंबर तुमच्या ऑपरेटरच्या नंबरवर रीडायरेक्ट होतो.
5. Code 27673855#
अनेकदा आपल्या नकळतपणे आपल्या फोनमधला डेटा सर्व क्लीन होतो. अशा वेळी हा डेटा कसा लीक होतोय हे माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही जर अशी समस्या आल्यास Code 27673855# हा कोड वापरू शकतात. आणि संबंधित माहिती मिळवू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :