एक्स्प्लोर

Meta Vibes : सोशल मीडियावर होणार धुमाकूळ! Meta नं आणलं नवं प्लॅटफॉर्म Vibes; चुटकीसरशी बनवता येणार AI व्हिडीओ, जाणून घ्या A टू Z माहिती

Meta Vibes: मेटाने एक नवीन AI-जनरेटेड व्हिडीओ फीड सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मवर फक्त AI ने तयार केलेले व्हिडीओच दिसतील. मेटाने या फीडला Vibes असे नाव दिले असून याला मेटा AI मध्ये अ‍ॅक्सेस करता येईल.

Meta Vibes : सोशल मीडियावर (Social Media) आता धुमाकूळ होणार आहे. कारण मेटाने 'Vibes' नावाचा एक नवा AI व्हिडीओ फीड सुरू केला आहे, ज्यामध्ये वापरकर्ते AI व्हिडीओ तयार करू शकतील आणि रीमिक्सही करू शकतील. सोशल मीडियामध्ये एक नवीन श्रेणी निर्माण करण्यासाठी मेटाने हे मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे अनेक प्लॅटफॉर्मच्या अडचणीत वाढ होऊ शकते, जे सध्या कंटेंटसाठी पूर्णतः युजर्सवर अवलंबून आहेत. मेटाने या नव्या फीडद्वारे AI-जनरेटेड कंटेंटवर मोठा डाव खेळला आहे.

कसे वापरायचे Vibes? (how to use Vibes)

Vibes ला Meta AI अ‍ॅप आणि मेटाच्या वेबसाइटद्वारे वापरता येईल. हे एक प्रकारचे AI चॅटबॉट आहे, जे क्रिएटिव हब म्हणून कार्य करेल. उदाहरणार्थ, सध्या तुम्ही सोशल मीडियावर इतर लोकांनी तयार केलेले व्हिडीओ पाहता. पण Vibes प्लॅटफॉर्मवर, माणसाने दिलेल्या प्रॉम्प्टवरून AI तयार केलेले व्हिडीओज दिसतील. जर तुम्हाला एखादा व्हिडीओ आवडला, तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला तो रीमिक्स करण्याचा पर्याय देतो. त्यामध्ये तुम्ही नवीन म्युझिक घालू शकता, व्हिज्युअल्स बदलू शकता, किंवा स्वतःच्या पसंतीनुसार नवीन प्रॉम्प्ट देऊन एक संपूर्ण नवीन व्हिडीओ तयार करू शकता.

मेटाची सरस बाजी (Meta launches Vibes) 

टिकटॉकला नव्या पद्धतीने टक्कर देताना, मेटाने सोशल मीडियाच्या एका नव्या श्रेणीमध्येही आपली आघाडी मिळवली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच एलन मस्क यांनी सांगितले होते की, बंद पडलेली Vine अ‍ॅप पुन्हा सुरू केली जाऊ शकते, ज्यामध्ये AI जनरेट केलेले व्हिडीओज दाखवले जातील. पण मस्क यांची ही योजना प्रत्यक्षात येण्याआधीच मेटाने आपला नवा प्लॅटफॉर्म 'Vibes' लाँच करून आघाडी घेतली आहे. हा प्लॅटफॉर्म अशा प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की, तो मेटाच्या इकोसिस्टममध्ये सहज समाविष्ट होतो. म्हणजेच, Vibes वर तयार केलेले व्हिडीओ सहजपणे Instagram आणि Facebook च्या स्टोरीज किंवा रील्समध्ये शेअर करता येतील. यामुळे Vibes ला वापरकर्त्यांकडून मोठी पसंत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Swadeshi Tech : पंतप्रधान मोदींचे भारतीयांना 'स्वदेशी तंत्रज्ञान'कडे वळण्याचे आवाहन; व्हॉट्सॲप, गुगल मॅप्स, जीमेलसाठी कोणते आहेत पर्याय?

iPhone 17 Scratch Problem: धक्कादायक! नव्याकोऱ्या आयफोन 17 मोबाईलवर पडतायत चरे, जगभरातील युजर्सची धाकधूक वाढली, नक्की काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Embed widget