(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jio New Year Offer : वर्ष संपण्यापूर्वीच JIO चा भन्नाट प्लॅन; 24 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी अन् Jio TV, jio Cinema फ्री!
नवीन वर्ष येण्यापूर्वीच रिलायन्स जिओने प्रीपेड युजर्सना(Jio) न्यू इयर गिफ्ट देत आहे. कंपनी आता आपल्या 2999 रुपयांच्या लाँग टर्म प्लॅनसोबत तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स देणार आहे.
Jio New Year Offer : नवीन वर्ष येण्यापूर्वीच रिलायन्स जिओने प्रीपेड युजर्सना(Jio) न्यू इयर गिफ्ट देत आहे. कंपनी आता आपल्या 2999 रुपयांच्या लाँग टर्म प्लॅनसोबत तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स देणार आहे. जर तुम्हीही रिलायन्स जिओ युजर असाल आणि लाँग व्हॅलिडिटी असलेला प्लॅन खरेदी करत असाल तर जिओ 2999 प्लान तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही रिलायन्स जिओने युजर्सना एक्स्ट्रा बेनिफिट्स देण्याची योजना आखली आहे. जिओ न्यू इयर ऑफर अंतर्गत जिओच्या 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतील? चला जाणून घेऊया....
रिलायन्स जिओचा जिओ 2999 प्लान 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो, परंतु जिओच्या न्यू इयर ऑफर अंतर्गत 2999रुपयांचा प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सना आता 24 दिवसांच्या अतिरिक्त व्हॅलिडिटीचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच 2999 रुपयांच्या या जिओ प्रीपेड प्लॅनसोबत युजर्संना आता एकूण 389 दिवसांची वैधता (365 दिवसांसह 24 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी) मिळणार आहे. त्यानुसार पाहिलं तर या प्लॅनमध्ये तुमचा दैनंदिन खर्च 7.70 रुपये होईल.
डेटा-कॉलिंग आणि SMS
व्हॅलिडिटी वगळता या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या इतर बेनिफिट्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 64 केबीपीएसपर्यंत कमी होईल. जर तुमच्या भागात 5G सेवा असेल तर तुम्हाला या प्लॅनसोबत अनलिमिटेड 5जी डेटाचा फायदा मिळेल. डेटाव्यतिरिक्त या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.
जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेस
जिओ 2999 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेस दिला जाणार आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली जाणार आहे ती म्हणजे 2999 रुपयांच्या या प्लॅनसोबत तुम्हाला जिओ सिनेमाचे प्रीमियम सब्सक्रिप्शन दिले जाणार नाही.
Jio unlimited 5G data plan लाँच
रिलायन्स जिओने 909 रुपयांचा (Jio unlimited 5G data plan) नवा प्री-पेड प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 5G डेटासह येतो. तसेच ओटीटी अॅप्सचे (Reliance Jio) सब्सक्रिप्शन मिळते. जिओने 909 रुपयांचा अनलिमिटेड डेटा प्लॅन लाँच केला आहे. ट्रायच्यावतीने जिओ आणि एअरटेलला अनलिमिटेड डेटाच्या अटी आणि शर्ती स्पष्टपणे सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशावेळी अनलिमिटेड 5G डेटा म्हणजे 30 दिवसांसाठी जास्तीत जास्त 300 जीबी डेटा मिळणार आहे.
इतर महत्वाची बातमी-