(Source: ECI/ABP News/ABP Majha)
iQOO Z7 च्या लॉन्चिंगनंतर iQOO Z6 5G च्या किंमतीत कपात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
iQOO Z6 5G Vs iQOO Z7: iQOO Z7 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या फोननंतर लगेचच कंपनीने iQOO Z6 5G च्या किंमतीत कपात केली आहे.
iQOO Z6 5G Vs iQOO Z7: iQOO Z7 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या फोननंतर लगेचच कंपनीने iQOO Z6 5G च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, iQOO Z6 5G आता 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. हा एक मध्यम रेंजचा स्मार्टफोन आहे. फोनच्या किमतीत कपात तर झालीच आहे, पण त्यासोबत अनेक उत्तम डिस्काउंट ऑफर्सही उपलब्ध आहेत. सवलतीनंतर फोनची किंमत आणखी कमी होते. अशातच 2023 मध्ये याचा नवीन मॉडेल भारतात आला असून तुम्ही याचा जुना मॉडेल म्हणजेच iQOO Z6 5G फोन विकत घ्यावा का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
iQOO Z6 5G Vs iQOO Z7: किंमत
iQOO Z6 5G च्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपयांपर्यंत खाली आली आहे. यापूर्वी या फोनची किंमत 15,499 रुपये होती. याचा अर्थ फोनवर 1,000 रुपयांची कपात झाली आहे. मात्र सध्या किंमतीतील कपात कंपनीच्या वेबसाइटवरच पाहता येईल. नवीन लॉन्च केलेल्या iQOO Z7 च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपये आहे. ICICI आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर हा फोन खरेदी केल्यास 1,500 रुपयांची सूट दिली जात आहे. यामुळे खर्च आणखी कमी होतो.
iQOO Z7 5G हा जुन्या फोनपेक्षा चांगला फोन आहे, पण त्याची किंमत थोडी जास्त आहे आणि लोकांना तो विकत घेण्यासाठी 15,000 रुपये जास्त द्यावे लागतील. IQOO Z6 हे ज्या किंमतीला विकले जात आहे त्या किमतीसाठी चांगले स्मार्टफोन आहे. जर तुम्ही तुमचे बजेट सुमारे 4,500 रुपयांनी वाढवू शकत असाल, तर तुम्ही नवीन iQOO Z7 स्मार्टफोनसाठी जावे.
iQOO Z6 चे फीचर्स
- प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर
- डिस्प्ले: 6.58-इंच LCD डिस्प्ले
या स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले आहे. इतक्या किंमत हा फोन मिळत असल्याने हा चांगला पर्याय ठरतो. मात्र त्यात एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे कंपनी दीर्घकाळासाठी सॉफ्टवेअर सपोर्ट देत आहे. या फोनमध्ये तुम्हाला दोन वर्षांचे मोठे अँड्रॉइड अपडेट्स तसेच तीन वर्षांचे सिक्युरिटी पॅच मिळतील. हँडसेट Android 14 OS वर देखील काम करू शकतो. यात 5,000mAh बॅटरी आहे आणि 18W फास्ट चार्ज सपोर्ट आहे.
Nokia C12 Pro लॉन्च
HMD Global ने Nokia C12 Pro लॉन्च केला आहे. नोकिया C12 चा हा प्रो मॉडेल आहे. हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर, 2GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, नाईट आणि पोर्ट्रेट कॅमेरा मोडसह समोर आणि मागे दोन्हीसाठी लॉन्च करण्यात आला आहे.