आयफोन-16 भारतातही आला रे... Apple स्टोअरबाहेर उडाली झुंबड, मुंबईतही तुडुंब गर्दी, VIDEO पाहून म्हणाल बापरे बाप
Iphone 16 Series: Apple च्या iPhone 16 सीरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. कंपनीनं 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या अॅन्युएल इव्हेंट 'इट्स ग्लोटाईम'मध्ये AI फिचर्स असलेल्या iPhone 16 सीरिज लॉन्च केली होती.
Iphone 16 Series: मुंबई : आजपासून बहुप्रतिक्षित आयफोन 16 (iPhone 16 Series) भारतात दाखल झाला आहे. अशातच देशभरातील आयफोन (IPhone Lovers) प्रेमींनी अॅपल स्टोअरबाहेर (Apple Store) गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे, मुंबईत आयफोन-16 (Mumbai Apple Store) खरेदी करण्यासाठी पहाटेपासून ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
Apple च्या iPhone 16 सीरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. कंपनीनं 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या अॅन्युएल इव्हेंट 'इट्स ग्लोटाईम'मध्ये AI फिचर्स असलेल्या iPhone 16 सीरिज लॉन्च केली होती. अशातच, आजपासून आयफोन भारतात दाखल झाला असून अॅपल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पण त्यापूर्वीच मध्यरात्रीपासूनच मुंबईतील बीकेसी येथील दुकानाबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ॲपल स्टोअर सुरू होण्यापूर्वीच लोक पहाटेपासूनच दुकानाबाहेर गर्दी करताना दिसले. आयफोन 16 ची प्रचंड क्रेझ आयफोन प्रेमींमध्ये दिसून येत आहे. अशीच काहीशी क्रेझ मागच्या वेळी iPhone 15 लाँच झाला, तेव्हाही पाहायला मिळाली होती.
यासंदर्भात बोलताना एका ग्राहकानं सांगितलं की, "मी गेल्या 21 तासांपासून रांगेत उभा आहे. मी काल सकाळी 11 वाजता इथे आलोय आणि आज सकाळी 8 वाजता दुकानात प्रवेश करणारा मी पहिलाच व्यक्ती आहे. मी खूप उत्साही आहे." मुंबईतील वातावरण या फोनसाठी पूर्णपणे नवीन आहे. गेल्या वर्षी मी 17 तास रांगेत उभा होतो."
#WATCH | Maharashtra: Apple begins its iPhone 16 series sale in India; a large number of people throng the company's store in Mumbai's BKC pic.twitter.com/5s049OUNbt
— ANI (@ANI) September 20, 2024
कंपनीनं iPhone 16 सीरीजमधील चार नवे फोन लॉन्च केले आहेत. यामध्ये तुम्हाला डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतील. दरम्यान, आयफोनच्या संपूर्ण इतिहासात ॲपलनं पहिल्यांदाच जुन्या आयफोनपेक्षा कमी किमतीत नवा आयफोन लॉन्च केला आहे. हे विशेषतः भारतात घडलं आहे. याआधी कंपनीनं गेल्या वर्षी सारख्याच किमतींत आपले फोन लॉन्च केले होते. म्हणजेच, दरांत कोणतीही वाढ झाली नाही, परंतु यावेळी संपूर्ण खेळ बदलला आहे.
आयफोन 16 सिरीजची स्टँडर्ड किंमत काय? (Price of iPhone 16)
आयफोन 16 या फोनची किंमत फोन 799 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 67,000 रुपयांपासून पुढे आहे तर आयफोन 16 प्लसची किंमत 899 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण 75500 रुपये असेल. आयफोन 16 प्रो (128 जीबी) मॉडेलची किंमत 999 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 83,870 रुपये असणार आहे. आयफोन 16 प्रो मॅक्स (256 जीबी) मॉडेलची किंमत 1199 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण एक लाख रुपये असणार आहे.
भारतात आयफोन 16 किती रुपयांना मिळणार? (Indian Price of iPhone 16)
प्रत्येक देशात तेथील स्थानिक कररचनेनुसार आयफोन 16 सिरीजच्या फोनची किंमत वेगवेगळी असणार आहे. भारतात आयफोन 16 हा फोन 79900 रुपयांना मिळणार आहे. तर आयफोन 16 प्लस हा फोन 89900 रुपयांना मिळेल. आयफोन 16 प्रो हा फोन 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून पुढे मिळेल. तर आयफोन 16 प्रो मॅक्स हा फोन भारतीय बाजारात 1 लाख 44 हजार 900 रुपयांना मिळणार आहे.