(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Facebook Instagram Privacy: इन्स्टाग्राम, फेसबुकची तुमच्या फोनवर करडी नजर; आताच Privacy Setting करुन घ्या, नाहीतर ....
Facebook Instagram हे सर्व अॅप्स तुमच्यावर नजर ठेवतात, तुमची कोणतीही अॅक्टिव्हिटी किंवा सर्च ट्रॅक केला जातो. ते थांबवण्यासाठी कोणत्या सेटिंग्ज करायच्या पाहुयात...
Facebook Instagram Privacy : आजकाल प्रत्येक स्मार्टफोन युजर मेटाचे लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरतो. पण तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा जेव्हा तुम्ही गुगल किंवा इतर कोणत्याही अॅपवर एखादी गोष्ट सर्च करता तेव्हा तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामवर त्याच्याशी संबंधित जाहिराती दिसू लागतात. जर तुम्हाला कोणी ही तुमच्यावर लक्ष ठेवू इच्छित नसेल आणि सोशल मीडियावर तुमची प्रायव्हसी कायम असेल तर तुम्ही तुमच्या फोनमधील ही सेटिंग देखील बंद करू शकता. टेक कंपन्या जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावतात आणि हे सर्व अॅप्स तुमच्यावर नजर ठेवतात, तुमची कोणतीही अॅक्टिव्हिटी किंवा सर्च ट्रॅक केला जातो. मात्र, लोकांची प्रायव्हसी लक्षात घेऊन मेटा प्रायव्हसी सेटिंग्समध्ये बदल करण्याचा पर्यायही देते. अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग कसे थांबवता येईल ते जाणून घेऊया...
इन्स्टाग्रामला इंटरनेट Activity ट्रॅक करण्यापासून कसे थांबवावे?
- सर्वप्रथम तुमचे इन्स्टाग्राम अॅप ओपन करा. खालच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या आपल्या प्रोफाईलवर जा.
- नंतर वरच्या उजव्या कोपऱ्यातून तीन आडव्या रेषांवर टॅप करा आणि Settings and Privacy निवडा.
- Settings and Privacy पर्यायांतर्गत Activity वर टॅप करा आणि नंतर Activity Off Meta Technologies टॅप करा.
- नंतर ट्रॅकिंग थांबविण्यासाठी Disconnect Future Activity टॉगल चालू करा.
Facebook ला इंटरनेट अॅक्टिव्हिटीट्रॅक करण्यापासून कसे रोखायचे?
१. सर्वप्रथम फेसबुक प्रोफाईलवर जा. त्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
2. त्यानंतर Settings & Privacy मध्ये जा आणि Settings वर टॅप करा.
3. Your Facebook Information जा आणि Off-Facebook Activity वर क्लिक करा.
4. त्यानंतर Manage Your Off-Facebook Activityवर क्लिक करा. त्यानंतर age Future Activity वर टॅप करा.
5. आता Future Off-Facebook Activity बंद करा.
Instagram Account हॅक झालं?
Instagram Account हॅक होतं त्यामुळे तुमचं Instagram Account हॅक झालंय हे कसं ओळखाल? यासंदर्भात काही टिप्स सांगणार आहोत.
-मेटाचे इन्स्टाग्राम हे जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स रिल्स, व्हिडिओ, पोस्ट, स्टोरीज या गोष्टी एकमेकांशी शेअर करू शकतात. युट्युबप्रमाणेच आता या अॅपमधूनही लोक चांगले पैसे कमवत आहेत. हॅक झालंकी नाही पाहण्यासाठी तुम्हाला अॅपच्या आतील प्रोफाईलमध्ये जाऊन सेटिंग्स अँड प्रायव्हसीमध्ये जाऊन अकाउंट सेंटरवर क्लिक करावं लागेल.
-त्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि सिक्युरिटीवर क्लिक करावे लागेल आणि सिक्युरिटी चेक अंतर्गत Where you log in या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
-या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमचं अकाऊंट कुठे उघडलं आहे हे दिसेल. या लिस्टमध्ये तुम्हाला एखादे अनोळखी डिव्हाइस दिसले तर त्या डिव्हाइसमधून अकाऊंट लॉग आऊट करा आणि पासवर्डही बदला.
-या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमचं अकाऊंट कुठे ओपन आहे हे दिसेल. या लिस्टमध्ये तुम्हाला एखादे अनोळखी डिव्हाइस दिसले तर त्या डिव्हाइसमधून अकाऊंट लॉग आऊट करा आणि पासवर्डही बदला.
-अतिरिक्त सुरक्षा म्हणून, आपल्या खात्याचा 2 FA चालू ठेवा. असे होईल की जेव्हा जेव्हा आपण आपल्या खात्यात लॉगिन कराल तेव्हा आपल्याला एक अतिरिक्त पासवर्ड टाकावा लागेल जो आपल्या मोबाइल नंबरवर येईल.
इतर महत्वाची बातमी-