Google च्या मदतीने तुम्हाला Whatsapp Ban पासून दिलासा मिळणार; 'ही' पद्धत वापरून पाहा
Whatsapp : जर तुम्ही व्हॉट्सॲपवर लॉग इन करू शकत नसाल किंवा तुमच्या खात्यावर बंदी घातली असेल, तर तुम्ही Google च्या मदतीने तुमचं अकाऊंट पुन्हा सुरु करू शकता.
Whatsapp : जर तुमचंही व्हॉट्सअप (Whatsapp) अकाऊंट बॅन झालं असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्ही गुगलच्या मदतीने तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट पुन्हा सुरु करू शकता. खरंतर, व्हॉट्सअप हे एक सर्वात लोकप्रिय अॅप आहे. पण, अनेकदा मेटा अकाऊंटमध्ये काहीही गडबड झाल्यास तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट बॅन होतं. अनेकदा व्हॉट्सअप अकाऊंटच्या विरोधात केलेल्या अहवालांमुळेही तुमचं अकाऊंट बॅन होऊ शकतं. पण प्रश्न असा पडतो की अकाऊंटला रिकव्हर कसं करू शकतो आण त्यावरचा बॅन कसा हटवू शकतो? यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
तुम्ही तुमचा बॅन केलेला व्हॉट्सॲप नंबर दोन पद्धतीने रिऍक्टिव्ह करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहोत. या पद्धती वापरून पाहिल्यानंतर, तुमचे WhatsApp पुन्हा चालू होऊ शकते.
अशा प्रकारे व्हॉट्सॲप अकाउंट होईल ठीक
- यासाठी सर्वात आधी गुगलच्या सर्च बारमध्ये 'व्हॉट्सॲप सपोर्ट' लिहून सर्च करा.
- या ठिकाणी तुम्हाला सर्वात वर कॉन्टॅक्ट व्हॉट्सॲपचा पर्याय दिसेल. या वेबसाईटवर क्लिक करा.
- आता तुम्हाला येथे एक फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमची काही माहिती द्यावी लागेल. तुम्ही कोणता नंबर वापरत आहात, कोणते अकाऊंट वापरत आहात. वैयक्तिक किंवा व्यवसाय, तुमचा ईमेल आयडी, ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- Please enter your message वर जो कंटेट दिला असेल तो तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता.
या मेसेजनंतर तुम्हाला काही दिवसांत रिप्लाय मिळेल. या प्रक्रियेनंतर, तुमचं अकाऊंट ठीक होण्याचे पर्याय वाढू शकतात.
दुसरी पद्धतही सोपी आहे
- यासाठी तुम्हाला फक्त या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुमच्या अकाऊंटवर बंदी घातल्यावर, तुमच्या अकाऊंटवर मेसेज येतो की तुमचं अकाऊंट झालं आहे. समर्थनासाठी संपर्क साधा. येथे तुम्ही खालच्या उजव्या बाजूला दिलेल्या सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा.
- येथे देखील तुम्हाला समस्येचे वर्णन करण्यास सांगितले जाईल, तुम्ही येथे वर नमूद केलेला संदेश टाइप करू शकता. पुढील पर्यायावर क्लिक करा आणि सबमिट करा. यानंतर तुम्हाला ७२ तास प्रतीक्षा करावी लागेल, व्हॉट्सॲप तुमची विनंती बघून प्रतिसाद देईल.
- याशिवाय, तुम्ही व्हॉट्सॲपवर मेल देखील करू शकता. WhatsApp चा ईमेल आयडी आहे- Support@whatsapp.com.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही खूप मोठा गुन्हा केला असेल किंवा व्हॉट्सअपच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन केलं असेल तर तुमचं अकाऊंट रिकव्हर होऊ शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :