Galaxy Z Flip 5 And Samsung Galaxy Z Fold 5 : सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोनचे प्री-बुकिंग सुरू ; जाणून घ्या फिचर आणि किंमत
Samsung च्या Galaxy Z Flip 5 आणि Samsung Galaxy Z Fold 5 ची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. सॅमसंगने या दोन्ही हँडसेटची डिलिव्हरी आजपासून म्हणजेच 11 ऑगस्टपासून सुरू केली आहे.
Galaxy Z Flip 5 And Samsung Galaxy Z Fold 5 Pre-Booking : फोल्डेबल मोबाईल तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung च्या Galaxy Z Flip 5 आणि Samsung Galaxy Z Fold 5 ची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. सॅमसंगने या दोन्ही हँडसेटची डिलिव्हरी 11 ऑगस्टपासून सुरू केली आहे. जाणून घेऊयात फिचर्स आणि किंमत.
28 तासांत 1,00,000 प्री-बुकिंग
डिव्हाइसची विक्री 18 ऑगस्टपासून सुरू होईल. कंपनीने 27 जुलै रोजीच या दोन हँडसेटसह इतर अनेक Samsung ची उपकरणे सादर केली होती. कंपनीने माहिती दिली की, नवीन फोल्डेबल स्मार्टफोनला भारतातील ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे आणि भारतात पहिल्या 28 तासांत तब्बल 1,00,000 प्री-बुकिंग्स झाल्या आहेत.
कशा असतील किंमती
Samsung Galaxy Z Flip 5 ची किंमत रु. 99,999 (8GB/256GB) पासून सुरू होते, तर Samsung Galaxy ZFold 5 ची किंमत रु. 1,54,999 (12GB/256GB) पासून सुरू होते. Samsung Galaxy Z Flip 5 ची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 20,000 रुपयांचा फायदा मिळेल आणि Galaxy Z Fold 5 ची प्री-बुकिंग करणाऱ्यांना कंपनी Rs 23,000 चा फायदा देणार आहे.
Samsung Galaxy Z Flip 5 चे स्पेसिफिकेशन
सॅमसंग जो नवीन स्मार्टफोन आहे त्याच्या अनेक भन्नाट फिचरसह उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये 3700mAh इतक्या क्षमतेची बॅटरी असणार आहे आणि 25 वॅटचा फास्ट चार्चिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोन स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 SoC आणि IP58 रेटींगसह उपलब्ध होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच इतका एफएचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. जो 120hz इतक्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो.
सॅमसंगच्या Z Fold 5 मध्ये असतील हे फीचर्स
तुम्हाला Samsung Galaxy Z Fold 5 मध्ये 7.6 इंच अमोलेड डिस्प्ले आणि 6.2 इंचचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्टेड आहे. त्यामुळे डिस्प्लेची गुणवत्ता अत्यंत चांगली आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 जनरेशनचा असून 2 चिपसेटसोबत उपलब्ध होऊ शकतो. ज्यांना फोटो काढण्याची आवड आहे आणि बेसिकपासून सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी हा फोन चांगला पर्याय ठरु शकतो. यामध्ये फोटो घेण्यासाठी ट्रिपल कॅमेरा सिस्टीम उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड,10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेराही देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या