एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Samsung Galaxy Z Fold 5 लवकरच होणार लाँच, गुगलच्या Pixel Fold स्मार्टफोनला देणार जबरदस्त टक्कर

मोबाईल कंपन्यांमधील आघाडीची कंपनी सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन जूलै महिन्यात लाँच होणार असल्याचं समजतं.

Samsung Galaxy Z Fold 5 Launch Date : मोबाईल कंपन्यांमध्ये आघाडीची अँड्रॉईड फोन कंपनी म्हणून सॅमसंगचा चांगलाच दबदबा आहे. सध्या कंपनीचा सॅमसंग गॅलेक्सी Z Fold सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन आहे. आता कंपनीने Samsung Galaxy Z Fold 5 हा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच लॉन्च करण्याच्या तयारी आहे. याशिवाय सॅमसंगचा फ्लिपेबल स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ओप्पो आणि गुगलच्या फोल्डेबल फोनला जबरदस्त टक्कर देऊ शकतात. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगपूर्वीच एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने फोनच्या लॉन्चिंगची तारीख आणि सर्व फीचरची माहिती शेअर केली आहे. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या म्हणण्यानुसार, सॅमसंग कंपनी अपकमिंग Samsung Galaxy Z Fold 5 हा फोन 26 जुलै रोजी एका पब्लिक इव्हेंटमध्ये लॉन्च करणार आहे. यानंतर 11 ऑगस्ट रोजी स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचं समजतं.  

सॅमसंगच्या Z Fold 5 मध्ये असतील हे फीचर्स 

तुम्हाला Samsung Galaxy Z Fold 5 मध्ये  7.6 इंच अमोलेड डिस्प्ले आणि 6.2 इंचचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्टेड आहे. त्यामुळे डिस्प्लेची गुणवत्ता अत्यंत चांगली आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 जनरेशनचा असून 2 चिपसेटसोबत उपलब्ध होऊ शकतो. ज्यांना फोटो काढण्याची आवड आहे आणि बेसिकपासून सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी हा फोन चांगला पर्याय ठरु शकतो. यामध्ये फोटो घेण्यासाठी ट्रिपल कॅमेरा सिस्टीम उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड,10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेराही देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला सेल्फी फोटोसाठी 10 मेगापिक्सेलचा कॅमेरा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12 GB इतका रॅम आणि 512 GB पर्यंत इंटरनल स्टोअरेजसह लॉन्च केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन  अँड्रॉईड 13 वर काम करणार असल्याचं समजतं.

या स्मार्टफोनची किंमत जाणून घ्या 

Samsung Galaxy Z Fold 5 या स्मार्टफोनची किंमत जवळपास 1 लाख 47 हजार रूपये इतकी असणार आहे. अर्थात, सध्या या फोनच्या किंमतीबद्दल फक्त अंदाज वर्तवण्यात आला असून फोनच्या किंमतीबद्दल अजून तरी अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे सॅमसंगच्या चाहत्यांना अजून काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Google Pixel Fold च्या फिचर्सबद्दल जाणून घ्या 

अलिकडेच गुगलने पिक्सेल फोल्ड स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंच इतका आऊटर डिस्प्ले आणि मुख्य स्क्रीन 7.6 इंच इतका अमोलेड डिस्प्ले उपलब्ध करून दिला आहे. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्टेड आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सेल OIS कॅमेरा, 10.8 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 10.8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेऱ्याची सुविधा देण्यात आलेली आहे. फ्रंट साईडला सेल्फी आणि व्हिडीओ कॉल करण्यासाठी आऊटर डिस्प्ले 32 मेगापिक्सल आणि इनर डिस्प्लेसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या गुगल पिक्सल फोल्डमध्ये 20 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500 एमएएच इतकी पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे.  हा स्मार्टफोन गुगल टेन्सर G2 या चिपसेटवर वर्क करतो. जागतिक मार्केटमध्ये या स्मार्टफोनची किंमत जवळपास 1 लाख 47 हजार 405 रुपये इतकी आहे. मात्र, Samsung Galaxy Z Fold 5 स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळू शकते. कारण या दोन्ही फोनचे फीचर्स जवळपास समान आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget