एक्स्प्लोर

Jio आणि Airtel च्या युजर्सना मिळणारी मोफत 5G सेवा बंद होणार, महागड्या दरांसह नवे प्लॅन्स लॉन्च होण्याची शक्यता

भारतातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या Jio आणि Airtel लवकरच 5G प्लॅन आणणार आहेत, ज्याचे दर 4G प्लॅनपेक्षा 10% जास्त असू शकतात.

मुंबई : भारतीय टेलीकॉम युजर्सना आता हळूहळू 5G स्पीड नेटवर्कची सवय होत आहे, कारण Jio आणि Airtel त्यांच्या वापरकर्त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मोफत 5G सेवा देत आहेत. जेणेकरुन त्यांना या नवीन स्पीड इंटरनेटची सवय होईल आणि भविष्यात 5G योजना खरेदी करण्याचा विचार युजर्स करु शकतील. 

भारतात 5G सेवा सुरु होऊन बरेच महिने झाले आहेत. Airtel आणि Jio या भारतातील दोन टेलिकॉम कंपन्या आहेत ज्यांनी या देशात पहिल्यांदा 5G सेवा सुरु केली. पण अद्याप या कंपन्यांनी 5G प्लॅन लॉन्च करण्यात आलेले नाही. याचा अर्थ असा की अद्याप कोणत्याही वापरकर्त्याने 5G योजना खरेदी केलेली नाही, परंतु तरीही बरेच वापरकर्ते 5G स्पीड नेटवर्कचा लाभ घेत आहेत.

5G मोफत सेवा बंद होणार

Jio आणि Airtel ने त्यांच्या वापरकर्त्यांना 5G सेवेचे फायदे जाणून घेण्यासाठी आणि  त्यांना याची सवय लावण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मोफत अमर्यादित 5G सेवेची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या दोन कंपन्यांच्या काही निवडक युजर्सना 4G रिचार्जिंगवर अमर्यादित 5G सेवा मोफत दिली जात होती, परंतु आता असे होणार नाही. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमर्यादित 5G सेवा लवकरच संपणार आहे. या अहवालानुसार, Jio आणि Airtel दोन्ही कंपन्या स्वतंत्र 5G कनेक्टिव्हिटी योजना देऊ शकतात. 5G प्लॅनची ​​किंमत 4G प्लॅनपेक्षा 5 ते 10% जास्त असू शकते.

जागतिक स्तरावर, सर्वात वेगवान 5G सेवा भारतात आणली गेली आहे, जी केवळ एका वर्षात 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटींहून अधिक युजर्सपर्यंत पोहचलीये. तसेच Jio आणि Airtel या दोघांनीही अद्यापही त्यांच्या युजर्सना  5G सेवेसाठी शुल्क आकारले नाही. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या संबंधित सर्वाधिक लोकप्रिय 4G प्लॅन्ससह, वापरकर्त्यांना अमर्यादित 5G प्लॅनची ​​सुविधा मोफत दिली, जी अजूनही सुरू आहे.

कसे असणार  5G Prepaid Plans?

ET च्या अहवालात,  टेलीकॉम इंडस्ट्रीमधील तज्ञांनी असा दावा केला आहे की, Jio आणि Airtel त्यांचे संबंधित 5G सेल्युलर प्लॅन्स जून 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान लॉन्च करू शकतात.

5G योजना खरेदी करण्यासाठी वापरकर्त्यांना 10% पर्यंत जास्त खर्च करावा लागू शकतो.
5G प्लॅनमध्ये, 4G प्लॅनच्या तुलनेत 30% जास्त इंटरनेट डेटा दिला जाऊ शकतो.
सध्या, 4G प्लॅनमध्ये, सामान्यतः 1.5GB ते 3GB प्रति दिवस डेटा प्लॅन दिला जातो, परंतु 5G प्लॅनमध्ये, सुमारे 2GB ते 4GB प्रतिदिन डेटा प्लॅन दिला जाऊ शकतो.

याशिवाय, ET च्या अहवालात असेही म्हटले आहे की 2024 मध्ये 5G प्लॅन लॉन्च करण्यासोबतच कंपन्या 4G प्लॅनचे दर देखील वाढवणार आहेत.

हेही वाचा : 

आता WhatsApp अपडेट करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरची गरज लागणार नाही, आलं आहे 'हे' फिचर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget