Elon Musk यांचा ट्विटरवर नवा विक्रम, 38 शब्दांच्या 'या' ट्वीटला मिळाले तब्बल 528 मिलियनहून अधिक व्ह्यूज; तुम्ही पाहिलंत का?
Elon Musk : एलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोस्ट वाचण्याची मर्यादा निश्चित केली आहे. तसेच, ज्यांचे ट्विटरवर अकाऊंट नाही अशा लोकांसाठी ट्विटरचा एक्सेस बंद केला आहे.
Twitter : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून कायम चर्चेत राहिलं आहे. नुकतीच एलॉन मस्क यांनी ट्विटरवर दिवसाला पोस्ट वाचण्यावर मर्यादा घातल्या असल्याची मोठी घोषणा केली. मस्क यांनी एक ट्वीट केले. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, सशुल्क यूजर्स म्हणजेच ब्लू टिक असलेले लोक एका दिवसात 10,000 पोस्ट वाचू शकतील. त्याचप्रमाणे, अनव्हेरिफाईड यूजर्स दिवसाला 1,000 पोस्ट पाहू शकतात तसेच, ज्या लोकांनी नुकतंच ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे असे यूजर्स दिवसाला 500 पोस्ट वाचू शकतील. मस्क यांनी सुरुवातीला ट्वीट वाचण्याच्या मर्यादेसंदर्भात 38 शब्दांचे ट्विट केले. त्यानंतर त्यात काही अपडेट केले.
'या' ट्वीटने रेकॉर्ड केला
एलॉन मस्क यांच्या या 38 शब्दांच्या ट्वीटने नवा विक्रम रचला आहे. या ट्वीटचे व्हू्यज अजूनही वाढत आहेत. वृत्त लिहिपर्यंत ये ट्वीट 528 मिलियनहून अधिक लोकांनी वाचले होते. ट्विटरचे हे एकमेव असे ट्वीट आहे जे इतक्या मोठ्या संख्येने पाहिले गेले आहे.
To address extreme levels of data scraping & system manipulation, we’ve applied the following temporary limits:
— Elon Musk (@elonmusk) July 1, 2023
- Verified accounts are limited to reading 6000 posts/day
- Unverified accounts to 600 posts/day
- New unverified accounts to 300/day
व्ह्यूज पाहून एलॉन मस्कनाही झाला आनंद
एलॉन मस्क यांनी केलेल्या ट्वीटला मिळालेले व्ह्यूज पाहून त्यांना स्वत:लाही फार आनंद झाला. याच संदर्भात त्यांनी एक ट्वीट केले. मस्क यांच्या या ट्वीटवर यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, हे ट्वीट 1 बिलियन ट्रॅफिक पार करेल का?
खरंतर, ट्विटरचे मालक असण्याव्यतिरिक्त, एलॉन मस्क हे एकमेव असे व्यक्ती आहेत की ज्यांना ट्विटरवर सर्वाधिक लोक फॉलो करतात. 146 मिलियनहून अधिक यूजर्स त्यांना ट्विटरवर फॉलो करतात. मात्र, एलॉन मस्क स्वत: केवळ 341 लोकांना फॉलो करतात.
To address extreme levels of data scraping & system manipulation, we’ve applied the following temporary limits:
— Elon Musk (@elonmusk) July 1, 2023
- Verified accounts are limited to reading 6000 posts/day
- Unverified accounts to 600 posts/day
- New unverified accounts to 300/day
In yet another exercise in irony, this post achieved a record view count!
— Elon Musk (@elonmusk) July 2, 2023
महत्त्वाच्या बातम्या :
Twitter New Rules: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, आता Twitter वर दिवसाला वाचता येणार फक्त 600 पोस्ट