(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Apple iPhone : सॅमसंगला अॅपलचं खुलं आव्हान! येणार नवं फोल्डेबल डिवाइस
Apple एक नवीन डिवाइस घेऊन येत आहे. यामध्ये तुम्हाला मोठ्या आकाराचा डिस्प्ले मिळणापप असून तुम्ही हे ऑनलाईन देखील खरेदी करु शकता.
मुंबई : सध्या आयफोनचा (Iphone) बराच ट्रेंड सुरु आहे. यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे यात तुम्हाला अनेक उत्तमोत्तम फीचर्स मिळतात. आयफोन हा त्याच्या कॅमेऱ्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. सध्या अॅपल त्यांच्या एका नव्या डिवासईसवर काम करत आहे. आतापर्यंत सॅमसंग (SamSung) हे फोल्डेबल डिवासईस बनवण्यासाठी प्रसिद्ध होते. पण आता अॅपल देखील त्यांच्या फोल्डेबल डिवाइसवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अॅपलचे हे नवीन उत्पादन फोन किंवा टॅबलेट असू शकते, जे फोल्डेबल असणार आहे, असा दावा करण्यात येत आहे. वीन डिव्हाइसमध्ये 7 किंवा 8 इंच डिस्प्ले असणार आहे आणि त्याची खासियत म्हणजे ते फोल्ड होईल. म्हणजेच ते आणखी आकर्षक दिसेल. ॲपलने फोल्डेबल गॅझेट आणण्याची ही पहिलीच वेळ असेल.
'या' वर्षात कंपनी फोन लॉन्च करण्याची शक्यता
अॅपलकडून हे डिवाइस सध्या तरी लॉन्च केले जाणार नाही आहे. कंपनी 2026 किंवा 2027 मध्ये हे डिवाईस लॉन्च करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सना आता या उत्पादनासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. पण आता हा एक चर्चेचा विषय बनला आहे ज्याची Apple प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत अॅपलचे येणारे हे डिवाईस पहिलेच असणार आहे.
तुम्हाला iPad Mini मध्ये फार चांगली डिस्ल्पे क्वॉलिटी मिळत नाही. तसेच यामध्ये A15 बायोनिक चिप आहे, जी प्रिमियम फिल देते. यामध्ये 64GB स्टोरेजचा पर्याय देखील आहे, पण फार कमी युजर्स हे कमी स्टोरेज आवडते. याशिवाय इतर पर्यायही यामध्ये देण्यात आले आहेत. 2021 मध्ये iPad Mini ची सिरिज लाँच करण्यात आली होती, जी फार ट्रेंड झाली होती. पण फोल्डेबल डिव्हाईस आल्यावर ते घेऊन जाणे खूप सोपे होते.
आयफोनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
आयफोनला व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरील ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे भारतात ॲपलचा व्यवसाय झपाट्याने वाढत चालल्याचं चित्र आहे. कंपनीने सप्टेंबर-डिसेंबर तिमाहीत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनीही याचा उल्लेख केला. क्वार्टरली अर्निंग कॉलमध्ये अॅपलचे सीईओ म्हणाले की, भारताच्या रेव्हेन्यूमध्ये बरीच वाढ झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीची वाढ दुहेरी अंकात आहे आणि या तिमाहीत विक्रमी रेव्हेन्यू मिळवला आहे.
ही बातमी वाचा :
BHIM App : कॅशबॅकची धमाकेदार ऑफर! या अॅपवर मिळतोय भरघोस गॅरंटीड कॅशबॅक, ऑफर फक्त मर्यादित काळासाठीच