16GB रॅम, 1TB स्टोरेज; 27 मार्चला लॉन्च होणार Infinix HOT 30i, जाणून घ्या किती आहे किंमत
Infinix HOT 30i Launch: Infinix आपल्या नवीन मोबाईल आणण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर लिस्ट केला आहे.
Infinix HOT 30i Launch: Infinix आपल्या नवीन मोबाईल आणण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर लिस्ट केला आहे. जिथून मोबाईल फोनचे काही स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. Infinix भारतात 27 मार्च रोजी Infinix HOT 30i स्मार्टफोन लॉन्च करेल. यामध्ये ग्राहकांना 5000 mAh बॅटरी, 6.6 इंच डिस्प्ले, 16GB पर्यंत रॅम आणि 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Infinix HOT 30i Launch: किती असेल किंमत?
Infinix HOT 30i स्मार्टफोनची किंमत सुमारे 10,000 रुपये असू शकते. अधिकृतपणे कंपनीने अद्याप किंमत तपशील शेअर केला नाही. हा मोबाईल फोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला जाईल. ग्राहक रॅम 16GB पर्यंत वाढवू शकतात.
Infinix HOT 30i Launch: स्पेसिफिकेशन
Infinix HOT 30i च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास यात 6.6-इंचाचा HD Plus डिस्प्ले मिळेल. जो 90hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोबाईल फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल असेल. पुढील बाजूस सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल. ग्राहकांना हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. मोबाईल फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरवर काम करेल. यामध्ये तुम्हाला पॉवर बटणावर फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळेल. ज्यांना बजेट रेंजमध्ये स्वत:साठी नवीन मोबाईल फोन घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा मोबाईल फोन चांगला ठरू शकतो.
Xiaomi 30 मार्च रोजी दोन फोन लॉन्च करणार
30 मार्च रोजी, Xiaomi भारतात दोन परवडणारे फोन लॉन्च करेल. ज्यात Redmi Note 12 4G आणि Redmi 12C समाविष्ट आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी मिळेल. हे स्मार्टफोन 10,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केले जाऊ शकतात. Xiaomi च्या अधिकृत YouTube चॅनेलद्वारे तुम्ही मोबाईल फोनचा लॉन्च इव्हेंट पाहू शकाल.
OnePlus Nord CE 3 Lite 5G 4 एप्रिल रोजी होणार लॉन्च
चीनी स्मार्टफोन निर्माता OnePlus 4 एप्रिल रोजी बाजारात आपला परवडणारा फोन OnePlus Nord CE 3 Lite 5G लॉन्च करू शकते. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 6.7 इंच FHD प्लस डिस्प्ले, 8GB रॅम आणि 5000 mAh बॅटरी मिळू शकते.
इतर महत्वाची बातमी: