एक्स्प्लोर
Advertisement
यासिर शाह बनला कसोटीत जलद 200 विकेट्स घेणारा गोलंदाज
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद दोनशे विकेट्स घेण्याचा तब्बल 82 वर्षे जुना विक्रम आता त्याच्या नावावर जमा झाला आहे.
अबुधाबी : पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाहनं कारकीर्दीतल्या 33 व्या कसोटीत दोनशे विकेट्सचा पल्ला गाठून आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद दोनशे विकेट्स घेण्याचा तब्बल 82 वर्षे जुना विक्रम आता त्याच्या नावावर जमा झाला आहे.
अबुधाबी कसोटीत न्यूझीलंडच्या विल सोमरविल हा यासिर शाहचा दोनशेवा विकेट ठरला. त्यानं ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर क्लॅरी ग्रिमेट यांचा 1936 सालचा विक्रम आपल्या नावावर केला. ग्रिमेट यांनी कारकीर्दीतल्या 36व्या कसोटीत दोनशे विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली होती, तर यासिरने 33व्या कसोटीत हा विक्रम केला आहे.
यासिर शाहने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला 9 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या तर 100 विकेट्सचा टप्पा त्याने 17 कसोटीत पूर्ण केला होता. यासिरने पाकिस्तानकडून 33 कसोटी सामन्यात 3.08 च्या सरासरीने 200 विकेट्स घेतल्या आहे. त्याशिवाय एकदिवसीय सामन्यात यासिरच्या नावे 19 विकेट्स आहेत. मात्र टी20 सामन्यात त्याला एकही विकेट्स मिळाला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
फॅक्ट चेक
शेत-शिवार
Advertisement