(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yashasvi Jaiswal : यशस्वीकडून बशीरच्या फिरकीची बत्ती गुल! सिक्सची हॅट्ट्रिक करत केला पराक्रम!
23 वर्षीय यशस्वी जैस्वालने अनुभवी विराट कोहलीचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. विराटने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या.
Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचव्या कसोटीतील पहिल्या दिवशी भारतीय संघाचे पूर्ण वर्चस्व दिसून आले. पहिल्या गोलंदाजीत भारतीय फिरकीपटूंनी इंग्रजांना हादरा दिला. त्यानंतर सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या फलंदाजीने दणका बसला. जैस्वाल वनडेप्रमाणे कसोटी क्रिकेट खेळतो. यशस्वी जैस्वालने इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीरला रिमांडवर घेत तीन सिक्स ठोकले.
Shoaib Bashir will never forget this 👀
— Richard Kettleborough (@RichKettle07) March 7, 2024
6️⃣6️⃣6️⃣ by Yashasvi Jaiswal 👏
Anderson 🤝 Bashir = Jaisball #INDvENG #YashasviJaiswal #INDvsENG #RohitSharmapic.twitter.com/lYDoxUW4ri
शोएब बशीरने एका षटकात 3 षटकार ठोकले
शोएब बशीर भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंडच्या डावातील 9वे षटक टाकण्यासाठी आला होता. बशीरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून यशस्वी जैस्वाल स्ट्राइकवर होता. त्याने षटकातील दोन चेंडू आरामात खेळले, पण यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाहेर पडला आणि समोरच्या बाजूने षटकार मारला. यानंतर यशस्वी जैस्वालने शेवटचे दोन चेंडू षटकार खेचले. अशाप्रकारे यशस्वीने शोएब बशीरच्या एका षटकात 3 षटकार ठोकत 18 धावा केल्या.
Yashasvi Jaiswal in Test cricket.
— Johns. (@CricCrazyJohns) March 7, 2024
Age - 22
Matches - 9
Runs - 1004*
Balls - 1451
Average - 71.71
Strike Rate - 69.19
Hundreds - 3
Fifties - 3
The star in the making. ⭐ pic.twitter.com/2j1jYZRroJ
यशस्वी जैस्वालने विराट कोहलीचा विक्रम मोडला
23 वर्षीय यशस्वी जैस्वालने अनुभवी विराट कोहलीचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. विराटने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या. मात्र या मालिकेत जैस्वालने विराट कोहलीचा विक्रम मोडला.
- Completed 1,000 Test runs.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 7, 2024
- Completed 700 runs in the series.
- Completed most sixes record as an Indian against an opponent.
- Completed fifty plus scores in all 5 Tests.
Yashasvi Jaiswal, the record breaker, the superstar! 🫡🇮🇳 pic.twitter.com/fIwGQ6PGKt
इंग्लंड 218 धावा करून बाद
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो पूर्णपणे फ्लॉप झाला. धरमशाला येथे सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा संघ 218 धावांवर सर्वबाद झाला होता. भारताच्या सर्व विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या आहेत. कुलदीप यादवने पाच, तर रविचंद्रन अश्विनने 4 बळी घेतले. रवींद्र जडेजालाही एक यश मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या