(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma : तब्बल 151 स्पीडने बाउन्सर, सीमारेषेवर तीन फिल्डर, तरी सुद्धा हिटमॅन रोहितचा जबरा सिक्स
मार्क वुडची गणना केवळ इंग्लंडमधीलच नव्हे तर जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. तो ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करू शकतो.
धरमशाला : भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. पुल करण्यात त्याचा हात कोणीच धरु शकत नाही. कधी कधी ते रोहितसाठी दुधारी तलवारही ठरते. कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माविरुद्ध 2 ते 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतात. इंग्लंडविरुद्धच्या याच मालिकेत शतक झळकावल्यानंतरही रोहित बाउन्सरवर पायचीत झाला होता.
Mark Wood says "Hi" with 151.2 kmph and Rohit replied "Good Bye" with a pull shot for a six. 👌🫡pic.twitter.com/zITxigP7vh
— Johns. (@CricCrazyJohns) March 7, 2024
वुड आणि स्टोक्सचा प्लॅन
मार्क वुडची गणना केवळ इंग्लंडमधीलच नव्हे तर जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. तो ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करू शकतो. वुड आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने रोहित शर्माविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत जोरदार फिल्डिंग लावली होती. पुल शॉटसाठी त्याने लेग साइडच्या बाउंड्री लाइनवर तीन क्षेत्ररक्षक ठेवले. बाउन्सर मारून रोहित शर्माला अडकवण्याची त्याची तयारी होती.
151.2kmph delivery from Mark Wood.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 7, 2024
But Rohit Sharma says I'll play my favourite shot and send it out of the ground. 🫡pic.twitter.com/cuajTdxVHH
रोहितने षटकार ठोकला
चौथ्या षटकातील चौथा चेंडू मार्क वुडने टाकला. त्याचा वेग ताशी 151 किमी होता. रोहित शर्माही तयार होता. त्याने चेंडू बॅटच्या मधून खेचला. हे षटकार थर्ड मॅनवर गेले. या षटकारानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स टाळ्या वाजवताना दिसला. रोहित शर्माने वुडच्या पुढच्या चेंडूला चौकार ऑफ साइडला मारला.
- Hundred in 3rd Test.
— Johns. (@CricCrazyJohns) March 7, 2024
- Fifty in 4th Test.
- Fifty* in 5th Test.
Rohit Sharma has made a strong comeback in this Test series with bat. 🇮🇳 pic.twitter.com/wXAEJgK2BB
राजकोटमध्ये त्रासले होते
राजकोट कसोटीत मार्क वुडने टाकलेल्या चेंडूने रोहित शर्माला खूप त्रास दिला होता. भारतीय संघाच्या तीन विकेट लवकर पडल्या होत्या. अशा स्थितीत रोहितला मोठा फटका मारण्याचा धोका पत्करता आला नाही. यामुळेच वुडने त्याच्याविरुद्ध सतत बाउन्सरचा वापर केला आणि रोहित काही करू शकला नाही. पण या मॅचमध्ये तसं काही झालं नाही आणि संधी मिळताच रोहितने झोडपलं.
इतर महत्वाच्या बातम्या