एक्स्प्लोर
Advertisement
जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत भारताच्या रवी कुमारला कांस्य, ऑलिम्पिकचं तिकीटही कन्फर्म
भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. बजरंगपाठोपाठ भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियानेही जागतिक कुस्तीत 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे.
नूर सुलतान (कझाकस्तान) : भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. बजरंगपाठोपाठ भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियानेही जागतिक कुस्तीत 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. रवीने इराणच्या रेजा अहमदालीला 6-3 अशा फरकाने पराभूत केले. या कामगिरीसह रवी कुमारनेही टोकियो ऑलिम्पिकसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे.
दरम्यान, जागतिक कुस्ती स्पर्धेचा माजी सुवर्णविजेता पैलवान सुशील कुमारला कझाकस्तानमध्ये सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 74 किलो गटाच्या सामन्यात अझरबैजानच्या खाजीमुरादनं सुशील कुमारवर 11-9 अशी मात केली. या लढतीत सुशील कुमार 9-4 असा आघाडीवर होता. पण त्यानंतर खाजीमुरादनं सलग सात गुण घेत सुशीलला पराभवाचा धक्का दिला. सुशीलकुमारनं 2010 साली याच स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर नऊ वर्षांनंतर सुशीलकुमारनं जागतिक कुस्ती स्पर्धेत पुनरागमन केलं होतं.
#RaviKumarDahiya earns his Bronze🥉 Becomes Bronze medallist in his debut Senior World Championships after defeating Reza Ahmadali Atrinagharchi of Iran 6-3 in the Men's 57kg Freestyle event at #WrestleNursultan! #Kudos Ravi @FederationWrest 👏#WeAreTeamIndia🇮🇳 pic.twitter.com/Jup1w5qmRU
— Team India (@WeAreTeamIndia) September 20, 2019
Ravi wins bronze!🤼♂🥉🇮🇳 Congratulations to 22 yr-old debutant #RaviKumar as he beats Iran’s #RezaAtrinagharchi 6-3 to win bronze in men’s 57 kg at World #Wrestling C’ships.👏🏻 🔹He was a World Jr. medalist earlier. 🔹India has won 3 medals & 3 #OlympicQuota(s) in this event✅ pic.twitter.com/pMrByRvLkG
— SAIMedia (@Media_SAI) September 20, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
सोलापूर
Advertisement