एक्स्प्लोर

IND vs ENG, Virat Kohli : कोट्यवधी भारतीयांचा भ्रमनिरास, कोहलीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न यंदाही अधुरं

India vs England : भारतीय संघाला सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं आहे. ज्यामुळे भारताचं टी20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Virat Kohli Emotional : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये भारताला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला तोंड द्यावं लागलं आहे. इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. दरम्यान टीम इंडियाच्या या पराभवाने करोडो चाहत्यांची मनं तुटली आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या अनेक खेळाडूंची विश्वचषक विजयाची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे भारतीय संघाने 2007 नंतर अजून एकहादी टी20 विश्वचषक जेतेपद पटकावलेलं नाही.

भारताला आधी नाणेफेक गमवावी लागली. ज्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागलं. भारताचे सलामीवीर फेल झाल्यावर कोहली आणि पांड्या या दोघांनी भारताचा डाव सावरत 168 रन स्कोरबोर्डवर लावले. पण 169 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या ओव्हरपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत धावसंख्या वाढवत ठेवली. बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा तर हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. ज्यामुळे अवघ्या 17 षटकातंच त्यांनी हे आव्हान पार करत सामना खिशात घातला.

कोट्यवधी भारतीयांची मन तुटली

भारताचा हा अत्यंत महत्त्वाच्या सामन्यातील पराभव एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. 2007 मध्ये भारताने पहिल्यांदा आणि शेवटच्यांदा T20 विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. यावेळी टीम इंडिया आपल्या नेतृत्वाखाली वर्ल्ड चॅम्पियन होईल, अशी आशा सर्वांनाच होती. किंग कोहलीलाही हीच आशा होती. पण हे होऊ शकले नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, मात्र अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करू शकला नाही.  2007 नंतर 2014 मध्येही T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यांना अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर इंग्लंडने 2010 मध्ये विजय मिळवला होता, तर 2016 मध्येही फायनल गाठली होती. पण फायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून 4 विकेट्सने ते पराभूत झाले. यंदा त्यांना पाकिस्तानला मात देऊन विश्वचषक जिंकायची संधी आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget