Team India Coach : पुढच्या आठवड्यापासून मी बेरोजगार, काही काम असेल तर... ; टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राहुल द्रविडचा VIDEO Viral
Rahul Dravid Viral Video : भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 'मी पुढील आठवड्यापासून बेरोजगार आहे' असं ते म्हणत आहेत.
Rahul Dravid Video : भारतीय संघाने (India vs SA) 2024 चा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावत कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न साकार केलं आहे. हा विश्वचषक टीम इंडियाने (Team India) मुख्य प्रशिक्षक (Head Coach) राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या प्रशिक्षणात जिंकला. या विजयासोबतच राहुल द्रविड यांच्या हेड कोच पदाचा कार्यकाळही संपला आहे. आता भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी द्रविड यांच्यावर नसेल. टीम इंडियाला आता नवीन कोच मिळणार आहे. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 'मी पुढील आठवड्यापासून बेरोजगार आहे' असं ते म्हणत आहेत.
'पुढच्या आठवड्यापासून मी बेरोजगार, काही काम असेल तर...'
विश्वचषक जिंकल्यानंतर मीडिया समोर प्रतिक्रिया देतानाचा राहुल द्रविड यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल द्रविड पत्रकारांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी राहुल द्रविड पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणत आहेत की, ''मी लवकरच या माहौलमधून बाहेर पडेन. पुढच्या आठवड्यापासून माझ्यासाठी आयुष्य तसंच असेल. मी पुढच्या आठवड्यापासून बेरोजगार होईन. हा एकच फरक असेल. मी पुढच्या आठवड्यापासून बेरोजगार असेन, त्यामुळे जर काही काम, ऑफर असेल, तर सांगा. पण, हा विजय एक अविस्मरणीय क्षण होता.''
हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला
राहुल द्रविड यांनी 2024 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळली होती. आता टी-20 वर्ल्डकपमधील विजयानंतर हेड कोच म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ बीसीसीआयकडून वाढवण्यात येणार होता, मात्र राहुल यांनी याला नकार दिल्याची माहिती आहे. आता राहुल द्रविड यांच्या जागी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राहुल द्रविडचा व्हिडीओ व्हायरल
Rahul Dravid said - "I am unemployed from next week, any offers". 😂❤️
— Tanuj Singh (@ImTanujSingh) June 30, 2024
- Rahul Dravid is gem of a person. 💎 (Vimal Kumar).pic.twitter.com/ShEnSZzYVi
मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरचं नाव चर्चेत
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचं नाव चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून मुख्य प्रशिक्षक पदाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :