T20 World Cup 2022 : आता कोरोनाबधित खेळाडूही वर्ल्डकप खेळणार, आयसीसीकडून कोविड नियमांमध्ये शिथिलता, वाचा सविस्तर
World Cup 2022 : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे सर्वत्रच विविध प्रतिबंध लावण्यात आले होते, ज्यानंतर आता मात्र हळूहळू यामध्ये शिथिलता आणली जात आहे.
Corona Restrictions News in T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत यंदाच्या टी20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंधाखाली होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा आता दणक्यात होत असून विश्वचषकही धमाकेदाररितीने पार पडत आहे. विशेष म्हणजे आयसीसी (ICC) आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाने नुकतीच एक मोठी माहिती दिली असून आता कोरोनाबाधित खेळाडूही सामना खेळू शकतात. तसंच बाधित खेळाडूंना टेस्ट किंवा विलगीकरणाचीही सक्ती नसणार असून केवळ संघातील डॉक्टरच्या सल्ल्याने बाधित खेळाडूंना मैदानात उतरता येणार आहे.
कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच कोरोना नियमांशिवाय इतकी भव्य क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया हे तेच ठिकाण आहे जिथे टेनिस सुपरस्टार नोव्हाक जोकोव्हीचला कोरोना चाचणी न केल्यामुळे ऑस्ट्रेलिया ओपन खेळू दिली नव्हती. दरम्यान आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकादरम्यानचे कोरोना नियमांचा विचार करता, 'खेळाडू कोरोनाबाधित असूनही सामना खेळू शकतो. केवळ त्याला संघाच्या वैद्यकिय टीमकडून परवानगी तसंच त्यांचा सल्ल घेणं गरजेचं आहे. तसंच सुरक्षिततेचा मार्ग म्हणून त्याने गरजेच्या वेळी मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगही पाळण्याची गरज आहे.'
ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
कसं आहे यंदाच्या टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक?
सुपर 12 साठी पात्रता फेरीचे सामने
16 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध नामिबिया, गिलॉन्ग 9:30 वाजता
16 ऑक्टोबर अ गट : UAE विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
17 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता
17 ऑक्टोबर ब गट : झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड, होबार्ट दुपारी 1.30 वाजता
18 ऑक्टोबर अ गट : नामिबिया विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता
18 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
19 ऑक्टोबर ब गट : स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता
19 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1:30 वाजता
20 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता
20 ऑक्टोबर अ गट : नामिबिया विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
21 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, होबार्ट 9:30 वाजता
21 ऑक्टोबर ब गट : स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1.30 वाजता
सुपर 12 फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक
22 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी 12:30 वाजता
22 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ 4:30 वाजता
23 ऑक्टोबर A1 विरुद्ध B2, होबार्ट 9:30 वाजता
23 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
24 ऑक्टोबर बांगलादेश विरुद्ध A2, होबार्ट 12:30 वाजता
24 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध B1, होबार्ट 4:30 वाजता
25 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध A1, पर्थ दुपारी 4:30 वाजता
26 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9.30 वाजता
26 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
27 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, सिडनी सकाळी 8.30 वाजता
27 ऑक्टोबर भारत विरुद्ध A2, सिडनी 12:30 वाजता
27 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध B1, पर्थ दुपारी 4.30 वाजता
28 ऑक्टोबर अफगाणिस्तान विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9:30 वाजता
28 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
29 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध A1, सिडनी दुपारी 1:30 वाजता
30 ऑक्टोबर बांगलादेश विरुद्ध B1, ब्रिस्बेन सकाळी 8:30 वाजता
30 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध A2, पर्थ 12:30 वाजता
30 ऑक्टोबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ दुपारी 4.30 वाजता
31 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध B2, ब्रिस्बेन दुपारी 1:30 वाजता
1 नोव्हेंबर अफगाणिस्तान विरुद्ध A1, ब्रिस्बेन रात्री 9:30 वाजता
1 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बेन 1:30 वाजता
2 नोव्हेंबर B1 विरुद्ध A2, अॅडलेड 9:30 वाजता
2 नोव्हेंबर भारत विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड दुपारी 1:30 वाजता
3 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी दुपारी 1.30 वाजता
4 नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध B2, अॅडलेड 9:30 वाजता
4 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, अॅडलेड दुपारी 1.30 वाजता
5 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध A1, सिडनी दुपारी 1:30 वाजता
6 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध A2, अॅडलेड सकाळी 5:30 वाजता
6 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड रात्री 9.30 वाजता
6 नोव्हेंबर भारत विरुद्ध B1, मेलबर्न दुपारी 1:30 वाजता
हे देखील वाचा-