IND vs AUS : कर्णधार मायदेशी परतला, आता आणखी दोन खेळाडू मालिकेबाहेर, पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या
India vs Australia : आधीच दोन पराभव झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत सापडला होता. त्यात आता आणखी भर पडली आहे.
Josh Hazlewood India vs Australia Test Series : बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतानं विजय मिळवला. नागपूर आणि दिल्ली येथे झालेला कसोटी सामना भारताने एकतर्फी जिंकला. या पराभामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ पिछाडीवर आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाच संघ आणखी अडचणीत सापडला आहे. कौटुंबिक कारणामुळे कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला आहे. त्याशिवाय आणखी दोन खेळाडू मालिकेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, जोश हेजलवूड दुखापतीमुळे बॉर्डर गावस्कर मालिकेला मुकला आहे. त्याशिवाय डेविड वॉर्नरही मायदेशी परतणार असल्याचं समतेय. त्यामुळे आधीच अडचणीत सापडेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे तीन प्रमुख खेळाडू खेळणार नसल्याचं समजतेय.
नागपूर कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाला दिल्ली कसोटीतही पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवामुळे आधीच चिंतेच पडलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ तेव्हा अडचणीत सापडला जेव्हा कर्णधार मायदेशी परतला. पॅट कमिन्सच्या कुटुंबातील सदस्य गंभीर आजारी असल्यामुळे त्याला मायदेशी परत जावे लागले. त्यानंतर हेजलवूडच्या दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेल्याची बातमी आली. फोक्स क्रिकेटच्या एका वृत्तानुसार, हेजलवूड दुखापतीमुळे बॉर्डर गावस्कर मालिकेतून बाहेर गेलाय. त्याशिवाय डेविड वॉर्नरलाही मायदेशी पाठवण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. डेविड वॉर्डरच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला उपचारासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार आहे.
भारत दौऱ्यावर असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. भारतीय मैदानावर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. त्यातच वॉर्डर, कमिन्स आणि हेजलवूड यासारखे दिग्गज खेळाडू संघाबाहेर गेल्यामुळे आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता. हा सामना नागपूर येथे खेळवण्यात आला होता. तर दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने सहा विकेट्सने विजय मिळवला होता. आता इंदूर येथे तिसरा कसोटी सामना होणार आहे.
दोन कसोटी सामन्यांत कमिन्सनं घेतलेत फक्त 3 विकेट्स
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची कामगिरीही तशी फारशी चांगली नव्हती. दोन कसोटी सामन्यांत 39.66 च्या सरासरीने त्यानं केवळ तिनच विकेट्स घेतल्यात. जर कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वी सिडनीहून परत येऊ शकला नाही, तर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वात संघ तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्टीव्ह स्मिथ 2018 मध्ये सँडपेपर गेटपूर्वी संघाचा कर्णधार होता.
आणखी वाचा :
Pat Cummins: सलग दुसऱ्या कसोटीत कांगारूंचा पराभव; तरी कर्णधार कमिन्स मायदेशी परतला, नेमकं कारण काय?