PAK vs ENG : नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या संघाला केलं ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव केला.
England vs Pakistan T20 World Cup: टी20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत इतिहास रचला. बेन स्टोक्स आणि सॅम करन यांच्या दमदार खेळीच्या बळावर इंग्लंडने विश्वचषक पटकावला. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आलाय. नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या संघाला ट्रोल केलेय. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी पाकिस्तानच्या संघावर निशाणा साधलाय.
पाकिस्तानच्या पराभवानंतर मीम्सचा महापूर-
टी20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये इंग्लंडकडून पाकिस्तानचा पराभव झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या संघावर मीम्स तयार केले आहेत. नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या संघाची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर हे मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत.
ट्वीटरवर मेमे एकाडमी या युजर्सने पाकिस्तानच्या पराभवानंतर भन्नाट मीम्स शेअर केलेय. तो म्हणतो ‘बाय बाय पाकिस्तान, कुदरत का निजाम तुम्हे जीतने नहीं देना चाहता’
Bye Bye Pakistan 🥱🥱
— Meme Akademy (@Meme_Akademy) November 13, 2022
Qudrat ka Nizam tumhe jitne dena nahi chahta#meme_akademy #EngvsPak #ICCT20WorldCup2022 #T20WorldCup #Rizwan #BabarAzam #PKMKB #Final #PKMKBForever #WT2022 pic.twitter.com/cr9QYIpAjo
हरिओम तिवारीने म्हटलेय की, ‘हमारी गलती नहीं है’. हरिओमने त्यासोबत मजेदार कार्टूनचा फोटोही शेअर केलाय.
#WorldCup2022 #PakistanVsEngland #CricketWorldCup hamari galti nahi.... pic.twitter.com/3aSzzgLqX2
— Hariom tiwari (@cartoon_hariom) November 13, 2022
सीए अखिल पचोरीने पाकिस्तानच्या पराभवानंतर म्हटले की, ‘ना इश्क में ना प्यार में, जो मजा आता है पाकिस्तान की हार में’
Bina khele finals me phochke aur kya expect karrhe the? #WorldCup2022 #PakistanVsEngland #EnglandvsPakistan #Finals
— S.A. Darain (@darain_a) November 13, 2022
Indians 😂😂😂😂 pic.twitter.com/grDpuXH7Ik
— Monu Patel💜✨💜✨ (@Mr_GauriFied) November 13, 2022
When you realise, Netherlands can't help you win the finals....#PAKvENG #EngvsPak #PKMKBForever
— Sameer (@sameer2009ath) November 13, 2022
#BabarAzam out of the race for the post of Prime Minister of Pakistan...#T20WorldCupFinal #EngvsPak
— Ankit choudhary🇮🇳 (@ank_2691) November 13, 2022
Ye Sala Neend kyun nahi aa rahi 🥺#PAKvENG #BabarAzam #EngvsPak pic.twitter.com/6AbKh97ZYY
— 𝐴 𝑎 𝑑 𝑖 𝑖 (@Aadii_1727) November 13, 2022
Indian fans to Pakistan right now 😂#PAKvENG #T20WorldCupFinal pic.twitter.com/sTIjPryyHo
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) November 13, 2022
फायनल सामन्यात काय झालं?
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघानं निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 137 धावांपर्यंत मजल मारली होती. शान मसूद (38) आणि बाबर आझम (32) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून सॅम करनने भेदक मारा केला. सॅम करन याने 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. अदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत सॅम करनला चांगली साथ दिली. पाकिस्ताननं दिलेलं 138 धावांचं आव्हान इंग्लंड संघाने 19 व्या षटकात पार केलं. बेन स्टोक्स याने 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्याशिवाय कर्णधार जोस बटलर याने 26 धावांची खेळी केली.