एक्स्प्लोर

Shimron Hetmyer : 'प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,' वर्ल्डकप संघातून बाहेर केल्यानंतर शिमरॉननं रिपोस्ट केली स्टोरी

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडीज क्रिकेटनं त्यांचा स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायरला संघातून वगळलं आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला होणारी फ्लाईट मिस केल्यानं असं करण्यात आलं आहे.

Shimron Hetmyer to West Indies Cricket : वेस्ट इंडीज क्रिकेटने (West Indies Cricket) त्यांचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायरला (Shimron Hetmyer) विश्वचषक अगदी तोंडावर आला असताना संघाबाहेर केलं आहे. हेटमायरनं ऑस्ट्रेलियासाठी जाणारं विमान चुकवलं म्हणून बोर्डाने ही कारवाई केली असून आता हेटमायरनं आपली बाजू मांडत स्वत:ची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याची पार्टनर निरवानी हिची इन्स्टाग्राम स्टोरी रिपोस्ट केली आहे. ज्यात 'प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,' असं लिहिण्यात आलं होतं.

हेटमायरची पत्नी निरवानी आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'प्रत्येक गोष्टीची वेगळी दुसरी बाजूही असते.' तसंच तिने लिहिलं आहे की, 'ज्या काही गोष्टी अंधारात आहेत, त्या बाहेर आल्या पाहिजेत.'दरम्यान निरवानीची हीच स्टोरी शिमरॉननेही आपल्या इन्स्टाग्रामवर रिपोस्ट केली आहे. त्यामुळे शिमरॉनलाही कोणत्यातरी कारणामुळे विमान पकडता आलं नसावं अशी शक्यता व्यक्त होत आहे. तो याबद्दल नेमकी प्रतिक्रिया देतो का? याकडेही क्रिकेट जगातचं लक्ष आहे.  

नेमकं काय घडलं?

आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ शनिवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होता. परंतु, शिमरॉन हिटमायरच्या कौटुंबिक कारणांमुळं नियोजनात बदल करण्यात आला. संघाचे नियोजन ऑस्ट्रेलिसाठी शनिवारी रवाना होणार होतं. पण त्यानं विनंती केल्यानंतर वेस्ट इंडीजच्या संगाचा प्रवास सोमवारपर्यंत पुढं ढकलला गेला. मात्र, तरीही शिमरॉन हेटमायरनं ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणारे विमान चुकवलं. त्यानंतर सीडब्ल्यूआयच्या निवड समितीनं त्याला टी-20 विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्याऐवजी शमरह ब्रुक्ससाला संघात शामील करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आलीय. 

कधी, कुठे रंगणार स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 

टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ:
निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शमरह ब्रूक्स, जेसन होल्डर, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेड मॅकॉय, रेयॉन रेफर, ओडियन स्मिथ.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलंCM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget