पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
PAK vs ZIM T20 world cup 2022: थरारक सामन्यात झिम्बावेच्या संघानं पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव केला.
PAK vs ZIM T20 world cup 2022: थरारक सामन्यात झिम्बावेच्या संघानं पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची दमछाक झाली. अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या संघाला 11 धावांची आवश्यकता वेगवान गोलंदाज ब्रॅड इव्हान्सनं भेदक गोलंदाजी करत झिम्बाब्वेच्या संघाला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर शोएब अख्तरसह पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी टीकास्त्र सोडलं आहे. त्याशिवाय सोशल मीडियावरही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. कर्णधार बाबर आझम याच्यासह नवाज याच्यावर टीकास्त्र केलं. सोशल मीडियावर अनेकांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
पाहा नेटकरी काय म्हणाले?
जय हो 🚩#ICCWorldCup2022 #PAKvsZIM #zimbabar Pak Bean #T20WC2022 Revenge #PKMKBForever Nawaz #Upset Karachi pic.twitter.com/cX2GUXStMA
— राजेश "हिंदुस्थानी" (@rjs32826722) October 27, 2022
Nawaz be like pic.twitter.com/5S8ZLdFYk7
— ڈار مزمل حمید (@darmuzamil00) October 27, 2022
#Nawaz #PAKvZIM pic.twitter.com/6itztVQz65
— Jumlebaaz🏹 (@jumman_uncle) October 27, 2022
If nazar lg jati had real example..
— Urvah🇵🇰 (@FarzandUrva) October 27, 2022
Why @mnawaz94" you were afraid of hitting the ball?. Why Your confidence was so low?.
"Captaincy"
"Amir"
"Haider ali" pic.twitter.com/Ss4QAigVUI
Time proved Aftab Iqbal's words right.
— Waqas Akhter 🗨 (@waqasakhter077) October 27, 2022
Babar Azam's ego and wrong decisions led the Pakistani cricket team to the point where they could win against weak teams in such a big tournament.#T20worldcup22#PAKvsZIM
Shame on you Babar, Nawaz, Haider
Pak bean
Ramiz Raja 😡 Enough pic.twitter.com/olxX6LMnUZ
First kohli’s reaction after Pakistan vs Zimbabwe match #T20WC2022 #T20WorldCup2022 #PAKvsZIM #BabarAzam𓃵 #Nawaz pic.twitter.com/RRLZqnWUpr
— Ch Mansoor Hayat (@MansoorCh18) October 27, 2022
Cheif Selector ki Cheap Selection
— Abdul Khaliq (@realAbdulKhaliq) October 27, 2022
Match Winning Players 🤣🤣🤣#Haider #Nawaz #Asif #IftikharAhmed
Our King and "Lumber 1" #Lumber1 Players #Babar #Rizwan
In search of Gold we lost Diamonds@realshoaibmalik @SarfarazA_54 #WhoisResponsible@iramizraja @MuhammadWasim77 https://t.co/WRsAtoAFfU
सामन्याचा लेखाजोखा -
नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. झिम्बाब्वेकडून सेन विल्यम्सनं सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनिअर उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं या सामन्यातील चार षटकात 24 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर शादाब खाननं तीन विकेट्स घेतल्या. तर,हारिफ रौफच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली. 131 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले. बाबर आझम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळं पाकिस्तानची टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता वाढलीय.