Rassie Van Der Dussen DRS Controversy: दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजावर अन्याय? DRS वादावर ICC कडून चूक मान्य
ICC World Cup 2023: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान पंचांच्या काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच रॅसी व्हॅन डर ड्युसेनच्या विकेटवर बराच गदारोळ झाला.
ICC World Cup 2023, SA vs PAK: ICC क्रिकेट विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) च्या एका रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं (South Africa) पाकिस्तानचा (Pakistan) एका विकेटने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा सहा सामन्यांमधला हा पाचवा विजय ठरला. पाकिस्तानचा हा सलग चौथा पराभव ठरला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान पंचांच्या काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच रॅसी व्हॅन डर ड्युसेनच्या विकेटवर बराच गदारोळ झाला. टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज हरभजन सिंह यानंही यावरुन प्रश्न उपस्थित केले होते.
संपूर्ण घटना दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 19व्या षटकात घडली. त्या षटकात, पाकिस्तानी फिरकीपटू उसामा मीरच्या पाचव्या चेंडूवर मैदानावरील अम्पायर्सनी रॅसी व्हॅन डर ड्युसेनला एलबीडब्ल्यू आऊट केलं. ड्युसेनचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न चुकला आणि चेंडू त्याच्या गुडघ्याला लागला. ड्युसेननं तातडीनं डीआरएस घेतला. त्यानंतर, दाखवलेल्या पहिल्या बॉल ट्रॅकिंगमध्ये बॉल मिस झाल्याचे दिसून आलं. पण, काही काळातच तो ट्रॅकिंग लगेच काढून टाकण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एकदा बॉल ट्रॅकिंग दाखवण्यात आली. पण, ज्यावेळी दुसऱ्यांदा बॉल ट्रॅकिंग दाखवण्यात आली, त्यावेळी त्यामध्ये इम्पॅक्ट आणि हिटिंग दोन्हींमध्ये 'अंपायर्स कॉल' दाखवण्यात आलं. अशातच मैदानातील अंपायर्सनी आपला निर्णय कायम ठेवला आणि ड्युसेनला आऊट डिक्लेअर केलं आणि ड्युसेन पॅवेलियनमध्ये परतला. दरम्यान, असं फारच क्वचित वेळा पाहायला मिळतं, जेव्हा डीआरएस दरम्यान दोन वेगवेगळ्या बॉल ट्रॅकिंग दाखवल्या जातात.
THE CLOSEST UMPIRE'S CALL. pic.twitter.com/7KKd5iPiDu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 27, 2023
याप्रकरणावरुन बराच गदारोळ झाला. सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली होती. अशातच या संपूर्ण प्रकरणावर आता आयसीसीनं स्पष्टकरण दिलं आहे. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)नं म्हटलं आहे की, बॉल ट्रॅकिंगचं पहिलं ग्राफिक चुकून प्ले झालं होतं, ज्यामध्ये बॉल स्टंप मिस करत होती. आयसीसीच्या एका प्रवक्त्यानं म्हटलं आहे की, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात रॅसी व्हॅन डर ड्युसेनच्या एलबीडब्ल्यू रिव्यू दरम्यान चुकून एक अर्धवट ग्राफिक्स प्ले झालं होतं. त्यानंतर चूक दुरुस्त करत पूर्ण रिव्यू ग्राफिक्स पुन्हा दाखवण्यात आलं.
मार्करमची धमाकेदार खेळी
पाकिस्तानविरोधातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरा मानकरी एडेन मार्करमच आहे. मार्करमनं सात चौकार आणि एका षटकारच्या मदतीनं 93 चेंडूंवर 91 धावा केल्या. मार्करमनं सर्वात आधी रॅसी व्हॅन डर ड्युसेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्यानं डेविड मिलरसोबत पाचव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. गोलंदाजीमध्ये चार विकेट घेणाऱ्या तबरेज शम्सीला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :