T20 World Cup 2022: आयर्लंडला हरवून न्यूझीलंडच्या संघानं सेमीफायनलची शर्यत जिंकली!
T20 World Cup 2022: या स्पर्धेत सेमीफायनलचं स्थान गाठणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील 37 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं आयर्लंडचा (New Zealand vs Ireland) 35 धावांनी पराभव करत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. या स्पर्धेत सेमीफायनलचं स्थान गाठणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघानं न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 20 षटकात आयर्लंडसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 150 धावापर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात झंझावाती अर्धशतकीय खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) सामनीवीर म्हणून गौरवण्यात आलं.
कर्णधार केन विल्यमनसच्या 61 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 185 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघानं 9 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. दोन्हीही संघाचा टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील अखेरचा सामना होता.
आयर्लंडचा 35 धावांनी पराभव
न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 186 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि कर्णधार अॅंड्र्यू बालबर्नी यांनी पहिल्या विकेट्ससाठी 8.1 षटकात 68 धावा केल्या. बलबर्नी 30 धावांवर बाद झाला. यादरम्यान त्यानं तीन षटकार लगावले. त्यानंतर दहाव्या षटकात स्टर्लिंगही माघारी परतला. त्यानं 27 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 37 धावा केल्या. हे दोघं आऊट झाल्यानंतर आयर्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाला डाव सावरता आला नाही. यादरम्यान हॅरी टेक्टर 02, गॅरेथ डिलेन 10, लॉर्कन टकर 13, कर्टिस कॅम्फर 07 आणि फियान हँड 05 धावांवर बाद झाले. जॉर्ज डॉकरेलनx 15 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीनं 23 धावांचं योगदान दिलं. याशिवाय मार्क एडेरलाही केवळ 05 धावा केल्या. हा सामना न्यूझीलंडच्या संघानं 35 धावांनी जिंकला.
सुपर-12 ग्रुप 1 गुणतालिका-
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | नेट रनरेट |
1 | न्यूझीलंड | 5 | 3 | 1 | 1 | 7 | +2.113 |
2 | इंग्लंड | 4 | 2 | 1 | 1 | 5 | +0.547 |
3 | ऑस्ट्रेलिया | 4 | 2 | 1 | 1 | 5 | -0.304 |
4 | श्रीलंका | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -0.457 |
5 | आयर्लंड | 5 | 1 | 3 | 1 | 2 | -1.165 |
6 | अफगाणिस्तान | 4 | 0 | 2 | 2 | 2 | -0.718 |
हे देखील वाचा-