एक्स्प्लोर

IND vs SA, World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेविरोधात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल? 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे. या सामन्यासाठी सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-11वर असतील.

ICC World Cup, IND vs SA: टीम इंडियानं (Team India) क्रिकेट विश्वचषक 2023 (World Cup) मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सलग सात सामने जिंकले. आता भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आपला पुढचा सामना आज (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. अशा परिस्थितीत अव्वल दोन संघांमधील हा सामना 'फायनलपूर्वीचा अंतिम सामना' मानला जात आहे.

आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा 'बर्थडे बॉय' विराट कोहलीवर असतील. कोहलीला सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करायची आहे. मात्र, आफ्रिकन संघाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँडविरुद्धचा एक सामना वगळता 6 सामने जिंकले आहेत. तर, टीम इंडियानं आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत सर्व सामने जिंकले आहेत. तसेच, वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमध्ये सध्या टीम इंडिया पहिल्या स्थानावर कायम आहे. 

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल? 

ईडन गार्डन्सचा पिच फलंदाजांसाठी उपयुक्त ठरतो, पण नंतर या पिचची स्पिनर्सलाही मदत होते. अशा परिस्थितीत टीम इंडिया या सामन्यात अतिरिक्त स्पिनर फिरकी गोलंदाज (रविचंद्रन अश्विन) खेळवतो की नाही हे पाहणे बाकी आहे. अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ सुरुवातीचे सामने खेळता आले. मात्र, गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाने मैदानात उतरलेल्या प्लेईंग-11 ने चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न झाल्यास नवल वाटणार नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियानं आजवर स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. कोहली (442 धावा) आणि रोहित (402 धावा) जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनीही धमाकेदार खेळी करत . या वर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्ध 92 धावा करत प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. श्रेयस अय्यरनंही 82 धावा करून टीम इंडियाच्या फलंदाजांची जादू दाखवून दिली. 

जर आपण गोलंदाजीबद्दल बोललो तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी या दोघांनीही अनुक्रमे 15 आणि 14 विकेट घेतल्या आहेत. बुमराहनं सर्व 7 सामने खेळले आहेत, तर शामीनं केवळ 3 सामन्यात हा पराक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही मोहम्मद सिराजनं 7 षटकांत केवळ 16 धावा देत तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आहेत, त्यामुळे श्रीलंकेचा संघ 55 धावांत गारद झाला. स्टार स्पिनर कुलदीप यादव (10 विकेट) आणि रवींद्र जाडेजा (9 विकेट) यांनी मधल्या काही षटकांमध्ये आपली कामगिरी चोख बजावली.

डिकॉकला लवकर माघारी धाडणं गरजेचं 

दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचं झालं तर, शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकचा (545 धावा) फॉर्म गोलंदाजांसाठी फार वाईट ठरतो. डीकॉकला रोखणं भल्या भल्या गोलंदाजांसाठी अवघड होतं. सध्याच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 5 वेळा 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एडन मार्कराम (7 डावांत 362 धावा), रॅसी व्हॅन डर डुसेन (7 डावांत 353 धावा) आणि हेनरिक क्लासेन (315 धावा) यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. तसेच, साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजीत भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता आहे. मार्को जॅनसेननं आतापर्यंत 7 सामन्यात सर्वाधिक 16 विकेट घेतल्या आहेत. 

भारत-दक्षिण आफ्रिकेचा H2H रेकॉर्ड 

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं 3 आणि टीम इंडियानं 2 विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 90 सामन्यांपैकी टीम इंडियानं 37 आणि दक्षिण आफ्रिकेनं 50 सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले.

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य प्लेईंग-11

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget